आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे उपकरण अाणेल साखर नियंत्रणात, मधुमेहींसाठी आर्टिफिशिएल पँक्रियाजडिव्हाइस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - केंब्रिज विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ‘आर्टिफिशिअल पँक्रियाज’ हे उपकरण तयार केले आहे. ते अंगावर घातल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण आपोआप नियंत्रणात राहील. टाइप - २ स्टेजच्या रुग्णांना इन्सुलिन इंजेक्शनचीही गरज राहणार नाही. पुढील वर्षी उपकरण बाजारात येईल.

हे उपकरण बटण ऑन करताच शरीरात ग्लुकोजच्या पातळीवर लक्ष ठेवते. नंतर गरजेनुसार रुग्णाच्या त्वचेत पॅचेसद्वारे इन्सुलिन पुरवते. त्याचा आकार आयफोनसारखा आहे. ते शरीरावर कपड्यांच्या आत सहजपणे घालता येते. उपकरणाची किंमत जाहीर केलेली नाही. भारतात सुमारे पाच कोटी मधुमेही आहेत. अनेकांना इन्सुलिन घ्यावे लागते. टाइप-२ स्टेजच्या रुग्णांना बोटांत इंजेक्शन टोचून रक्तशर्करा तपासावी लागती. हे उपकरण रुग्णाच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवेलच, सोबत त्याची पातळी किती आहे, हेही सांगेल. चाचणीत तीन महिने रुग्णांना उपकरण वापरण्यास सांगण्यात आले. त्यांची ग्लुकोज लेव्हल ११% घटल्याची समोर आले. टीमचे सदस्य डॉ. होवेरका म्हणाले, उपकरणाच्या व्यावसायिक निर्मितीचा हक्क आम्ही मिळवला आहे. जगभरातील रुग्णांसाठी लवकरच ते उपलब्ध करून दिले जाणार आहे. कोणत्याही रुग्णास सहजपणे वापरता येईल, असे त्याचे डिझाइन आहे. उपकरणाच्या वापरामुळे रुग्णांना स्वादुपिंड प्रत्यारोपणाचीही गरज नसल्याचे चाचणीत समोर आले आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांनी त्यांना प्रत्यारोपण केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितलेले होते. युकेच्या डायबिटीज डायरेक्टर ऑफ रिसर्चच्या डॉ. एलिझाबेथ रॉबर्टसन म्हणाल्या, हे उपकरण मधुमेहींचे आयुष्यच बदलून टाकेल. धावपळीमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित न करू शकणाऱ्या रुग्णांना त्याचा फार फायदा होईल. वैज्ञानिकांनी इतके अद््भूत उपकरण दिल्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवे.
बातम्या आणखी आहेत...