आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

New York च्या पार्टी गर्लने केला ऐशोरामाचा त्याग, बनली जैन साध्वी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे अमेरिकेत असतानाचा निशाचा फोटो. उजवीकडे साध्वी बनल्यानंतरचे जीवन जगतानाचा फोटो. - Divya Marathi
डावीकडे अमेरिकेत असतानाचा निशाचा फोटो. उजवीकडे साध्वी बनल्यानंतरचे जीवन जगतानाचा फोटो.
निशा कपाशी हिने संसारातील सुखांचा त्याग करत, सन्यास स्वीकारला आहे. विशेष म्हणजे 27 वर्षीय निशा ही सन्यास पत्करणारी अमेरिकेत जन्मलेली पहिला तरुणी आहे. न्यूयॉर्कमध्ये जे क्र्यू कंपनीसाठी ती फॅशन मर्कंटायझर म्हणून ती काम करत होती. 18 जानेवारी रोजी तिने दीक्षा स्वीकारली.

दीक्षा स्वीकारण्याच्या अगदी काही दिवस आधीपर्यंत ती मॅनहॅटनच्या रस्त्यांवर ब्रँडेड कपडे आणि अॅक्सेसरीज परिधान करून फिरत होती. फॅशनेबल कपडे परिधान करणे आणि मित्रांबरोबर बाहेर जेवायला जाणे हे तिला जीवापाड आवडते. न्यू यॉर्कच्या या बड्या कंपनीसाठी काम करण्याच्या मोबदल्यात तिला गलेलठ्ठ पगार मिळत होता.
झगमगाटाने भरलेल्या फॅशनच्या दुनियेत वावरणाऱ्या निशाचे पालनपोषण हे मूळ भारतीय पद्धतीनेच झालेले होते. तिला तिच्या कुटुंबीयांनी मर्सीजच्या सिक्सथ अॅव्हेन्यूज, 34 स्ट्रीट येथे एक लॅव्हीस वन बेडरूम अपार्टमेंटही घेऊन दिलेले होते.

वयाच्या 23 व्या वर्षी मला आयुष्यात जे पाहिजे ते सगळं काही मिळालं होतं. पण तरीही मला आयुष्यामध्ये काही तरी राहून गेलंय असं सारखं वाटत होतं. तिला वाटणारी ही खंत दिवसेंदिवस वाझत होती. तिने अधिकाधिक यश मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यानी सर्वकाही जास्तच फिस्कटले.
त्यानंतर काही दिवसांनी तिच्या वागणुकीतील बदल तिला जाणवला. तीने स्वतःबाबत काळजी करणे कमी केले होते. मेकअप, सुंदर दिसणे यात कशातही तिला रस उरला नव्हता. पण त्यामुळे तिला आनंदीही वाटायला लागले होते. हीच तिच्या जीवनातील नवी सुरुवात होती.

त्यामुळे तिने 2011 मध्ये राजीनामा दिली आणि जैन धर्माचा अभ्यास सुरू केला. अखेर ती भारतात आली आणि साध्वी बनण्यासाठी तिने अभ्यास सुरू केला. 18 जानेवारी 2015 रोजी तिचे हे स्वप्नही पूर्ण झाले. त्या दिवशी तिने जैन साध्वी म्हणून दीक्षा घेतली. त्यानंतर तिने अगदी साधेपणाने जीवन जगण्यास सुरुवात केली आहे. ती केवळ सहा तास झोपते आणि जवळपास 90 मिनिटे मेडीटेशन करते. रोज सुमारे 15 तास ती जैन धर्माचा अभ्यास करते. कोणत्या भौतिक सुविधांचा उपभोग घेत नसली तरी एवढी आनंदी कधीही नव्हते, असे ती सांगते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, निशाचे आणखी काही PHOTOS
फोटो - कव्हर एशिया