आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वाधिक चर्चित अन् वादग्रस्त महिला सीईओ, किराणा दुकानात काम करायच्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१८ जून २०१२ ला मॅरिसा मेयर यांना एक कॉल आला. त्यांना फोनवर सांगण्यात आले की, आम्ही नव्या सीईओचा शोध घेत आहोत. आमची फॉर्च्युन ५०० कंपनी आहे. कंपनी सिलिकॉन व्हॅलीतच आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही शिफ्ट व्हावे लागणार नाही. ही तुमच्यासाठी योग्य नोकरी असेल. संचालक मंडळ तुमचे नाव विचारत आहे. तुम्हाला या नोकरीत रस आहे का? आम्ही याहूतून बोलतोय.

मॅरिसा तेव्हा गर्भवती होती आणि गेल्या १३ वर्षांपासून ती गुगलमध्ये काम करत होती. ती महिन्यांची रजा घेण्याच्या तयारीत होती. तिने विचार केला की, आता नोकरी बदलली तर त्यात धोका असेल. नव्या ठिकाणी कसे वातावरण असेल याचीही कल्पना नाही. बराच विचार केल्यावर तिने कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून याहूत रुजू होण्याचा निर्णय घेतला. जुलै २०१२ मध्ये ती याहूची सीईओ झाली.

३७ व्या वर्षी ती सीईओ झाली तेव्हा फॉर्च्युन ५०० कंपन्यांतील ती सर्वात तरुण सीईओ होती. ती जेव्हा सीईओ झाली तेव्हा ती याहूचे दिवस कसे बदलणार याची चर्चा वॉल स्ट्रीट ते सिलिकॉन व्हॅलीपर्यंत होती. त्यामुळेच मॅरिसाला टेक वर्ल्डमध्ये सर्वात यशस्वी, सर्वात अपयशी आणि सर्वात वादग्रस्तही मानले जात आहे.

तिने गुगलचे अनेक आयकॉनिक प्रॉडक्ट्स लाँच केले. गुगलच्या सर्च होमपेजच्या सर्चपेजची कल्पनाही तिचीच आहे. जीमेल आणि गुगल अर्थसारखी उत्पादनेही तिच्याच संमतीनंतर आणि कल्पनेमुळे प्रत्यक्षात आली. गुगलचे स्वत:चे अँड्रॉइड असताना ती आयफोनचाच वापर करत होती, हे विशेष. तिने याहूत अनेक मोठी कामे केली आहेत.

पण गेल्या एक-दोन वर्षांपासून याहूची स्थिती पुन्हा खराब होत आहे. २०१४ मध्ये तिने घेतलेल्या अनेक निर्णयांवर टीका झाली आहे. २०१५ मध्ये याहूच्या समभागांत ३० टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. अनेक कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. २०१५ मध्ये तर १२ महत्त्वाचे एक्झिक्युटिव्ह नोकरी सोडून गेले आहेत.

पुढे वाचा... कशी मॅरिसा मेयर, 36.5 कोटी डॉलर मिळतील वर्षांत मॅरिसाला याहूकडून