आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Video: बेशुद्ध होईस्तोवर माझ्यावर बलात्कार करायचे, वाचा यजीदी तरुणीची करूण कहानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेक्युरिटी काऊन्सिलच्या सदस्यांसमोर आपबिती सांगिताना नादिया. - Divya Marathi
सेक्युरिटी काऊन्सिलच्या सदस्यांसमोर आपबिती सांगिताना नादिया.
न्युयॉर्क (अमेरिका)- इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटलेल्या या यजीदी तरुणीने जेव्हा आपबिती सांगितली तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सेक्युरिटी काऊन्सिलमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांचे डोळे पाणावले. इराकमधील 21 वर्षीय नादिया मुराद बासे ताहा तीन महिने दहशतवाद्यांचा ताब्यात होती. यावेळी तिने अनन्वित अत्याचार सहन केले. तिच्याजवळ जवळपास दररोज बलात्कार व्हायचे. आता ती जर्मनीत राहत आहे.

वाचा नादियाची आपबिती
15 सदस्यांच्या काऊन्सिलला माहिती देताना नादिया म्हणाली, की इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात इराकमधील एका गावातून माझे अपहरण केले. एका बसमधून मला त्याच्या ताब्यात असलेल्या मोसूल शहरात घेऊन गेले. संपूर्ण प्रवासात ते माझ्यासोबत गैरवर्तन करीत होते. मी रडून-ओरडून त्यांच्याकडे माफी मागितली. पण त्यांच्यात हैवान संचारले होते. त्यांनी मला खुप मारले. त्यानंतर मला एका दहशतवाद्याच्या ताब्यात देण्यात आले. तो दररोज माझ्यावर बलात्कार करायचा. मी एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण गार्डने मला पकडले. त्या रात्री मला त्यांनी खुप मारले. अगदी कपडे काढून मारले. नंतर मला गार्डच्या ताब्यात देण्यात आले. त्याने माझ्यावर अगदी बेशुद्ध पडेपर्यंत बलात्कार केला.

रेप दहशतवाद्यांचे मोठे शस्त्र
नादियाने सांगितले, की संपूर्ण तीन महिने मला सेक्स स्लेव्ह सारखे ठेवण्यात आले. महिला आणि तरुणींवर बलात्कार करण्यात दहशतवादी आपली ताकद समजतात. त्यांचे हे एक मोठे शस्त्र आहे. त्यानंतर त्या महिला आणि तरुणी कधीच सामान्य आयुष्य जगू शकत नाहीत. मोसूल शहरात हजारो महिलांना आणि बालकांना अशा प्रकारे कैद करण्यात आले आहे. एकमेकांना गिफ्ट देण्यासाठी या महिला ठेवण्यात आल्या आहेत. महिलांवर अत्याचार करताना त्यांनी नकार दिला तर त्यांच्या चिमुकल्यांना बेदम मारहाण केली जाते. यात काही चिमुकल्यांचा जीवही जातो.

नादिया आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे आवाहन
मला इस्लामिक स्टेट्सपासून मुक्ती मिळवून द्या, असे आवाहन तिने केले आहे. तिची आपबिती ऐकून सेक्युरिटी काऊन्सिलचे अनेक सदस्यांना जागेवरच रडू कोसळले. अनेकांचे रडणे थांबत नव्हते. काही जण तिला आधार देण्यासाठी जागीच उभे झाले. यजीदी समाजाला संपविण्यासाठी इस्लामिक स्टेट्सकडून असे नरसंहार केले जात आहेत, असे राष्ट्रसंघाने सांगितले. शिवाय या दहशतवादी संघटनेविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.

पुढील स्लाईडवर बघा, या यजीदी तरुणीने सांगितली आपबिती... तेव्हा सेक्युरिटी काऊन्सिलमधील सदस्यांचे डोळे पाणावले... अखेरच्या स्लाईडवर बघा तिचा व्हिडिओ....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...