आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्रीवादळाचे सावट निवळल्यानंतर मदतकार्याला वेग, अंदमानातील अडकलेले पर्यटक सुरक्षित : राजनाथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अंदमानमधील हॅवलॉक बेटावर चक्रीवादळात अडकून पडलेले सुमारे १४०० पर्यटक सुरक्षित अाहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

राजनाथ यांनी गुरुवारी निकोबार बेटांचे नायब राज्यपाल जगदीश मुखी यांच्याशी फोनवरून या घटनेची चौकशी केली. मुखी यांनी घटनेबद्दलची सविस्तर माहिती दिली. हॅवलॉक बेटावरील सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. त्यांना हलवण्यासाठी सरकार सर्व पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. परंतु सध्या चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर बचाव पथकाचे काम सुरू होणार आहे. सध्या पोर्ट ब्लेअरवर बचाव पथक काम हाती घेण्यास तयार आहे. वादळामुळे प्रदेशात मुसळधार पाऊस, वादळी वारे येण्याची शक्यता आहे.

परतीचा मार्ग खंडित
चक्रीवादळामुळे १४०० पर्यटकांना नील व हॅवलॉक बेटावरच मुक्कामी राहावे लागणार आहे. त्यांचा परतीचा मार्ग खंडित झाला आहे. दोन्ही बेटांवरून पोर्ट ब्लेअरला आल्याशिवाय पुढील प्रवास करता येऊ शकत नाही. तूर्त तरी पर्यटकांना दोन्ही बेटांवरच राहावे लागेल, असे दक्षिण अंदमानचे उपायुक्त उदित प्रकाश राय यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...