आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सयुंक्त राष्ट्रसंघाला मजबुत करा, भारतासह जी-४ मधील देशांच्या मागणीकडे दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र -चीनच्या राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी भारतासह जी-४ मधील देशांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत संयुक्त राष्ट्र संघाला मजबुत करून त्यांच्या अधिकाराचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. जी-४ मध्ये भारत, ब्राझील, जर्मनी आणि जापान या देशांचा समावेश आहे. नुकतीच या देशांची बैठक झाली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, जर्मनीचे चान्सलर एंजेला मर्केल, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, ब्राझीलच्या राष्ट्रपती डिल्मा रुसेफ यांनी सहभाग घेतला. या सर्व नेत्यांनी संयुक्त राष्ट्रात सुधार तथा सुरक्षा परिषदेच्या विस्तारीकरणाची मागणी केली. त्याच बरोबर स्वत:ला संयुक्त राष्ट्र संघाचे स्थायी सदस्य म्हणून दावेदारीही केली आहे, तर जिनपिंग यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त सदस्य देशांना सिद्धांत आणि उद्देशा प्रती प्रतिबंध राहण्याचे आवाहन केले.
संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव बान की मून यांच्यासोबत झालेल्या चर्चेतही हा मुद्दा उपस्थित केला. विशेष म्हणजे त्यांनी या वेळी जी-४ मधील देशांची मागणीचा उल्लेखही केला नाही. यापूर्वी त्यांनी भारताच्या स्थायी सदस्य होण्यासाठी समर्थन देण्याचे ग्वाही दिली होती. जिनपिंग म्हणाले, सर्व सदस्य देश संयुक्त राष्ट्र संघाला मजबूत संस्था म्हणून पाहू इच्छितात. परंतु, हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा नियमांचे पालन सक्तीने लागू केले जाईल.

कोण-कोणाच्या मार्गातील आडकाठी
भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील हे चार देश सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य होण्यास उत्सुक आहेत. परंतु, जपानच्या मार्गात चीन व दक्षिण कोरीया, भारताच्या मार्गात चीन, पाकिस्तान तर जर्मनीच्या मार्गात फ्रान्स, ब्रिटेन आडकाठी आणू शकतात.