आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वर्क फ्रॉम होम’मुळे तणावामध्ये वाढ, संयुक्त राष्ट्राची अनेक देशांत पाहणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीनिव्हा - घरबसल्या कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याची सुविधा ही अनेकांना आनंददायी वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यातून तणाव, अनिद्रेचा आजार वाढू शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला आहे.  

संयुक्त राष्ट्राने भारतासह अनेक देशांत केलेल्या पाहणीनंतर जाहीर केलेल्या अहवालात हा दावा केला आहे. त्यात काम आणि जीवन यांच्यातील समतोल राखण्यासाठी आधुनिक संवाद माध्यमांचा उपयोग कशाप्रकारे केला जाऊ शकेल, याचा अभ्यास यातून केला आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलआे) व युरोफंडचेे संशोधक जॉन मेसेंजर यांनी सांगितले. त्यासाठी कामगार व तज्ज्ञांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या कार्यालयीन कामकाजात वापर करणाऱ्या व घरी बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या पाहणीत समावेश करण्यात आला होता.   
 
युनियनची सदस्य राष्ट्रे  
युरोपियन युनियनच्या १० सदस्य राष्ट्रांसह अर्जेंटिना, ब्राझील, जपान, भारत, अमेरिका इत्यादी देशांतील कर्मचाऱ्यांचा अभ्यास यातून करण्यात आला.  

टेलिवर्करची केस स्टडी  
विविध देशांतील घरी बसून काम करणाऱ्यांची उत्पादकता वाढली. त्यांच्या कामाचा दर्जाही वाढल्याचे पाहणीतून दिसून आले; परंतु अशा पद्धतीने सातत्याने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खासगी आणि कार्यालयीन जीवन यातील फरक करणे कठीण झाले होते, हे दिसून आले. 
 
दीर्घकाळ कामाची सवय  
कार्यालयाबाहेर काम करणाऱ्यांना दीर्घकाळ कामाची सवय लागते. त्यातून तणाव वाढीस लागतो. अनिद्रेसारख्या समस्या उदभवतात.  
 
फ्रान्स, जर्मनीत कायदा  
फ्रान्स, जर्मनीत यासंबंधीचा कायदा तयार करण्यात आला आहे. त्यात कर्मचाऱ्यांना टेलिवर्कर म्हणून काम देण्याबाबतचा निर्णय कंपनी आपल्या स्तरावर घेऊ शकते. फ्रेंच कामगार कायद्यात दुरुस्ती केली आहे.  
बातम्या आणखी आहेत...