आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Students Draw Painting Of Terrorism On Walls Of School

सिरिया : शाळांच्या भिंतीवर रेखाटले मुलांच्या मनामध्ये असलेल्या दहशतीचे चित्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इदलिबच्या शाळेत भिंतीवर मुलांनी काढलेली दहशतवादाची चित्रे. - Divya Marathi
इदलिबच्या शाळेत भिंतीवर मुलांनी काढलेली दहशतवादाची चित्रे.
इदलिब - सिरिया सध्या ISIS चे दहशतवादी आणि बंडखोरांच्या समस्येने त्रस्त आहे. येथे प्रत्येक वेळी डोक्यावर भितीची तलवार टांगलेली असते. चार वर्षांपासून हीच स्थिती आहे. त्यामुळे या ठिकाणच्या मुलांच्या मनातही दहशतीचे वातावरण आहे. ही दहशत मुलांच्या डोळ्यातही स्पष्टपणे दिसून येते. अगदी शाळांमध्येही याचा प्रत्यय येऊ लागला आहे. इदलिब प्रांताच्या शाळेमधील काही फोटो समोर आले आहेत. या शाळेती भिंतींवर मुलांच्या मनातील भिती चित्ररुपाने उमटली गेली आहे. मुलांनी भिंतींवर घरे उध्वस्त करणाऱ्या टँकचे फोटो काढले. आपल्या लोकांचे रक्त सांडणारा गद्दार असतो हे या मुलांना शिकवले जात आहे.

असे होते माझे घर, दहशतवाद्यांनी केले उध्वस्त...
एक मुलगी शाळेत बोर्डवर घराचे चित्र काढत होती. तिचे घर कसे होते हे सांगण्याचा प्रयत्न ती त्या माध्यमातून करत होती. काही बंडकोरांनी मिसाईलद्वारे तिचे घर उडवले आणि सर्वकाही संपले, असे या मुलीने सांगितले.
काही FACTS
चार वर्षांमध्ये मारले गेले 12,964 चिमुरडे
75 लाखांपेक्षा जास्त लोकांना सोडावे लागले घर
30 लाख मुलांनी दहशतवादामुळे सोडली शाळा
20 लाख मुले रेफ्युजी कँपमध्ये राहत आहेत
80 हजारांपेक्षा जास्त चिमुकल्यांचा जन्म झाला रेफ्युजी कँपमध्ये
04 हजारांपेक्षा अधिक शाळा जमिनदोस्त झाल्या
2011 मध्ये शाळांमध्ये 97% उपस्थिती असायची
चार वर्षांनंतर उपस्थितीचे प्रमाण 17% वर आले
हल्ल्यात 03 पैकी एका मुलाचा मृत्यू होतोय

पुढील स्लाइड्सवर पाहा, सिरियातील इदबिल शाळेत शिकणाऱ्या मुलांचे PHOTOS