आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे Painting आहेत यावर विश्वासच बसणार नाही, पाहा तरुण चित्रकाराच्या कलाकृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाण्यातून प्रवास करताना तुम्हाला अचानक एखादी सुंदर स्त्री पाण्यातून डोके काढून जणू तुमच्याकडे पाहत आहे, असे दिसले तर, प्रथम तर तुम्हाला त्यामुळे धक्का बसेल. किंवा ते दृश्य स्वप्नवत वाटेल. पण पाण्याबाबतचे आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी हवाई येथील एका चित्रकाराने प्रत्यतक्षात अशी चित्रे साकारली आहेत. ती चित्रे प्रथमदर्शनी पाहायला खरीच वाटू लागतात.

हवाई येथे जन्मलेले पेंटर सर्फर सीन योरो या तरुण चित्रकाराने हे पेंटींग साकारले आहेत. त्याला हुला म्हणूनही ओळखले जाते. नैसर्गिक पाण्याच्या साठ्याच्या पार्श्वभूमीचा वापर करून या चित्रांमध्ये जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भग्नावस्थेत असलेल्या ठिकाणांमध्ये पुन्हा जीवन सुरू व्हावे या प्रयत्नातून अशा प्रकारच्या जुन्या ठिकाणांची चित्रांसाठी निवड करत असल्याचे योरो सांगतो.

योरो हे पेंटींग अशाप्रकारे साकारतो की, जणू खरंच या सौंदर्यवती पाण्यामध्ये पोहत असाव्यात असा भास निर्माण होतो. पाण्याचा त्यासाठी अत्यंत सुरेख असा वापर करण्यात आला आहे. हे पेंटींग पाहणाऱ्याला योरोच्या कल्पनाशक्तीचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. प्रत्यक्षजीवनापेक्षा वेगळे असे या पेंटिंगचे अस्तित्व भासत असले तरी ते खरे असल्यासारखेच दिसतात. विशेष म्हणजे या पेंटिंगमध्ये करण्यात आलेल्या रंगांच्या शेडच्या वापरामुळे यात जीवंतपणा निर्माण झाला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, योरोचे Paintings...
बातम्या आणखी आहेत...