आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू अपघातातच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू ऑगस्ट १९४५ मध्ये विमान अपघातात झाल्याचा दावा करण्यात आला आहे. बोस फाइल्स डॉट इन्फोने हा दावा करताना ब्रिटनचे एक पत्र जाहीर केले. भारताच्या व्हाइसरॉयनी ब्रिटनच्या तत्कालीन मंत्र्यांना ४ सप्टेंबर १९४५ रोजी एक पत्र पाठवले होते. तैपेईमधील विमान दुर्घटनेत नेताजींचा मृत्यू झाल्याचे मानले जाते. २७ आॅगस्ट १९४५ रोजी अपघात झाला होता, असे मानले जाते. त्या घटनेच्या नऊ दिवसांनंतर हे पत्र पाठवण्यात आले होते. व्हाइसरॉयनी तपासही केला होता.
बातम्या आणखी आहेत...