आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉलपटू पेलेच्या मुलाची शरणागती, 13 वर्षांची कैद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साआे पाआेलो - प्रसिद्ध फुटबॉलपटू पेलेचा मुलगा अॅडसन एडिन्नो डो नासिमेंटोला ब्राझील कोर्टाने शनिवारी १३ वर्षांची शिक्षा ठोठावली. त्याने शुक्रवारी समर्पण केले होते. पेले यांच्या सात मुलांपैकी एक असलेला अॅडसन वडिलांचा जुना क्लब सांटोसकडून काही काळ फुटबॉल खेळला आहे.  
 
एडिन्नोच्या विरोधात २००५ मध्ये पोलिसांनी खटला दाखल केला होता. एका तस्कराच्या अड्ड्यावर पडलेल्या छाप्यात त्यालाही अटक झाली. त्यानंतर टेलिफोन कॉल्सच्या आधारे त्याच्यावर मनी लाँडरिंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अगाेदरच तो सहा महिन्यांची कैदेची शिक्षा संपवून आला होता. 
 
तत्पूर्वी कोर्टाने एडिन्नोला ३३ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याने वरिष्ठ न्यायालयात अपील केले होते. गुरुवारी कोर्टाने अंतिम निकाल सुनावला. त्यात १२ वर्षे १० महिन्यांची शिक्षा झाली. त्याने सर्व आरोपांचे खंडन केले आहे. माफिया सोबतचा संबंध केवळ मादक पदार्थााइतकाच आहे. तस्करीशी नाही.
बातम्या आणखी आहेत...