आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचआयव्ही विषाणू विकासाच्या निदानात यश; रुग्णांना वाचवणे होणार शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- एचआयव्हीचा संसर्ग झाल्यानंतर त्याचा संपूर्ण शरीरात फैलाव कसा होतो व त्याचा वेग काय असतो याचे डिकोडिंग (प्रक्रियेचे निदान) संशोधकांना झाले आहे. एकदा संसर्ग झाल्यानंतर तो रोखण्यासाठी आता उपचार करणे शक्य होईल, अशी आशा आहे. एचआयव्ही विषाणूंचा फैलाव वेळीच रोखल्यास रुग्णाला यातून मुक्त करणे शक्य होईल. एचआयव्हीमुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती नष्ट होत जाते. प्रत्येक पेशीत त्याचा संचार सुरू झाला की रुग्ण दगावतो. 
 
एकदा एचआयव्हीची लागण एका पेशीस झाली की त्या पेशी पटलातून आणखी एक विषाणू तयार करण्यास एचआयव्ही विषाणू उद्युक्त करतो. या पेशीतून मग आणखी एक विषाणू (कॅप्सूल) तयार होतो व दुसऱ्या पेशीकडे त्याला संक्रमित करते. तयार झालेली कॅप्सूल हा स्वतंत्र विषाणूयुक्त असते. याची डिकोडिंग प्रक्रिया नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. या प्रक्रियेला ‘बडिंग’ अर्थात पेशीच्या बाहेर दुसरा स्वतंत्र विषाणूंचा समूह फलित होणे असे म्हटले आहे. संसर्गजन्य पेशीच्या बाहेर या कॅप्सूलचे फलन होत असल्याने इतर पेशींकडे एचआयव्ही संक्रमित होतो. या नवनिर्मित कॅप्सूलचे आवरण निघून गेल्यानंतर त्यातील एचआयव्ही आरएनए सक्रिय होतात. संशोधकांच्या मते या कॅप्सूलमध्ये एचआयव्ही प्रोटीन (गॅग प्रोटीन) असते.  

एचआयव्हीच्या शरीराअंतर्गत फैलावाची प्रक्रिया सध्या तरी समजली आहे. यातील आणखी गुंतागुंत समजण्यासाठी काही अवधी लागेल, असे संशोधक ग्रेगोरी व्होथ यांनी म्हटले आहे. ग्रेगोरी हे शिकागो विद्यापीठात कार्यरत आहेत.
 
इमेजिंग तंत्र येथेही उपयुक्त ठरणार 
सध्या इंटरनेटवर इमेजिंग तंत्रामुळे सुरक्षा प्रणाली अधिक मजबूत करण्यास मदत मिळत आहे. कॉम्प्युटर मॉडेलद्वारे गॅग प्रोटीनची सक्रियता तपासण्यात येईल, असे संशोधक ग्रेगोरी व्होथ यांनी म्हटले आहे. त्याच्या सदृश प्रतिमांमुळे त्याची सक्रियता पडताळणे शक्य होईल. एड्सच्या फैलाव शरीरात रोखण्यात गॅग प्रोटीनमधील घटकांचे विश्लेषण  मदतीचे ठरू शकते. एचआयव्ही विषाणूची फलन प्रक्रिया रोखण्याच्या दिशेने हे संशोधन सुरू आहे. यात यश आले तर अनेक एड्सग्रस्तांचे जीव वाचवणे शक्य होणार असल्याचा दावा संशोधकांनी केला.  
बातम्या आणखी आहेत...