आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१६ वर्षांच्या अनमोल तुकरेल या भारतीय मुलाची गुगलवर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात मोठे आणि उपयुक्त ठरलेले सर्च इंजिन गुगलवर एका भारतीयाने मात केली आहे. कॅनडात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या अवघ्या १६ वर्षांच्या अनमोल तुकरेल या मुलाने सर्च इंजिन तयार केले आहे. जगप्रसिद्ध गुगल सर्च इंजिनापेक्षा ते कित्येक पटींनी चांगले ठरले आहे. अनमोलचा दावा आहे की, त्याचे सर्च इंजिन गुगलपेक्षा ४७ टक्के, तर सामान्यत: २१ टक्के अचूक आहे. अनमोल नुकताच दहावी इयत्ता उत्तीर्ण झाला आहे. या सर्च इंजिनचे डिझाइन अवघ्या दोन महिन्यांत तयार केल्याचा त्याचा दावा आहे. या इंजिनचे कोड तयार करण्यासाठी त्याला फक्त ६० तास लागले. अनमोलने गुगलच्या विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी हे सर्च इंजिन विकसित केले.

गुगल जागतिक स्तरावर १३ ते १८ वर्षे वयाेगटातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करते. यात ऑनलाइन स्पर्धेचेही आयोजन करण्यात येते. अनमोल सध्या भारतातील अॅडटेक कंपनीत "आइस्क्रीम लॅब'मध्ये दोन आठवड्यांसाठी इंटर्नशिप करतो आहे.
अनमोल टोरंटो येथील होली ट्रिनिटी स्कूलचा विद्यार्थी असून तो तिसऱ्या इयत्तेतच कोडिंग करणे शिकत होता. त्याने गणित आणि कोडिंग याचे सोबतच शिक्षण घेतले आहे. त्याची कॉम्प्युटर टीचर त्याच्या प्रोजेक्टरवर खूप खुश आहे. मी कॉम्प्युटर सायन्स एका वर्षातच पूर्ण केले, यामुळे मी चांगला विद्यार्थी आहे हे त्यांना माहिती असावे. म्हणून त्याच्या टेस्ट केसेसची लिंकही ऑनलाइन केली आहे.