आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suicide Attack By ISIS On Iraq\'s Largest Oil Refinary Baiji

इराकच्या बैजीतील सर्वात मोठ्या रिफायनरीवर ISIS चा आत्मघातकी हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - ISIS च्या आत्मघातकी हल्लेखोरांनी ऑइल रिफाइनरीसाठी प्रसिद्ध असलेल्या इराकच्या बैजी शहरात अनेक स्फोट घडवून आणले आहेत. स्थानिक महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यामुळे त्याठिकाणी लढणारे सैनिक आणि शिया तरुणांना मागे हटावे लागले आहे.

इराकची सर्वात मोठी ऑइल रिफायनरी असलेल्या बैजीमध्ये सुमारे गेल्या वर्षभरापासून ISIS चे दहशतवादी आणि आतंकियों लष्कराच्या जवानांमध्ये संघर्ष सुरू आहे. दहशतवद्यांनी गेल्यावर्षी जूनमध्ये बैजीवर ताबा घेतला होता.

दहशतवाद्यांनी रविवारी रात्री स्थानिक वेळेनुसार रात्री आठ वाजता दोन कारमधीन आत्मघातली हल्ले केले. बैजीचे महापौर महमूद अल-जबुरी यांनी सांगितले की, ISIS च्या दहशतवाद्यांना हे शहर सोडण्यापूर्वी याठिकाणी अधिकाधिक नुकसान करायचे आहे. त्यांनी सांगितले की, "आत्मघातकी हल्लेखोर आणि स्नायपर ही त्यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे आम्ही काही अंतर ठेऊनच लढत आहोत, असेही त्यांनी सांगितले.