आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायजेरियात‍ शियांच्या जुलूसमध्ये आत्‍मघातकी हल्‍ला, 21 जण ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : ऑक्‍टोबर महिन्‍यादरम्‍यान नायजेरियाच्‍या एका मशिदीतही आत्‍मघाती हल्‍ला झाला होता. - Divya Marathi
फाइल फोटो : ऑक्‍टोबर महिन्‍यादरम्‍यान नायजेरियाच्‍या एका मशिदीतही आत्‍मघाती हल्‍ला झाला होता.
अबूजा- नायजेरियाच्‍या कानो राज्‍यात शिया मुस्लिमांच्‍या जुलूसमध्‍ये एका आत्‍मघातकी हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाला. बीबीसीने दिलेल्‍या माहितीनुसार, कानोपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या दकासोये गावात धार्मिक कार्यक्रमादरम्‍यान हा स्‍फोट झाला.

प्रत्‍यक्षदर्शिंनी माहिती दिल्यानुसार, दकासोये येथे शिया मुस्लिमांचा जुलूस निघाला होता. एक व्यक्तीजवळ स्फोटके होते. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, काही कळण्याच्या आतच त्याने स्वत:ला स्फोटकांनी उडवून स्फोट घडवून आणला.
आत्‍मघातकी हल्‍ल्‍यासाठी आले होते दोघे
कानोपासून 20 किलोमिटर दूर असलेल्‍या दकासोये गावात हा हल्‍ला घडवण्यासाठी दोघे तयारीनिशी आले होते. शिया मुस्‍लिम प्रतिवर्षी एका धार्मिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. यंदाही मुस्लिम लोक मोठ्या उत्‍साहात जुलूसमध्ये सहभागी झाले होते.

दरम्यान, नायजेरिया हा सुन्नी मुस्‍लिम बहुल देश आहे. त्‍यामुळे सुन्‍नी आणि शिया यांच्‍यात प्रचंड वाद आहेत.
- बॉम्‍बस्‍फोट झाला त्‍या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
- स्‍फोटातील जखमींची संख्या अधिक आहे.
- आतापर्यंत कोण्‍या दहशतवादी संघटनेने या हल्‍ल्याची जबाबदारी घेतली नाही.
- यामागे बोको हरम संघटनेचा हात असल्‍याचे शिया संगटनेचे मत आहे.
- या हल्‍ल्यामागे कोण आहे, यासंदर्भातील माहिती पोलिसांना मिळाली नाही.