आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेच्या आत्मघातकी हल्ल्यात नायजेरियात २२ ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैदुगुरी - ईशान्य नायजेरियातील शहर मैदुगुरी येथे बुधवारी सकाळी दोन महिला आत्मघातकींनी एका मशिदीत स्फोट घडवून आणले. यात २२ जणांचा अंत झाला.
मैदुगुरीला दहशतवादी संघटना बोको हरामचा बालेकिल्ला मानले जाते.एका आत्मघाती हल्लेखोर महिलेने उमरारी मशिदीच्या आत घुसून स्वत:ला उडवून दिले. दूसरी महिला बाहेर उभी होती. आत स्फोट होताच लोक बाहेरच्या दिशेने धावले. ते बाहेर पडताच दुसऱ्या महिलेने स्वत:ला उडवून दिले. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अब्दुल मोहंमद यांनी सांगितले की, १७ लोक जखमी झाले आहेत. उमर उस्मान नामक व्यक्तीने अल्लाचे आभार मानत सांगितले की उशिरा मशिदीत पोहोचल्याने त्याचा जीव वाचला. मैदुगुरीमध्ये २८ डिसेंबरनंतर प्रथमच हा हल्ला झाला आहे. त्या हल्ल्यात ५० लोक मारले गेले.