आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सऊदी अरबमध्ये आत्मघातकी हल्ला, 30 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाद- सऊदी अरबमधील कातिफ प्रातांत एका शिया मशिदीत झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 30 जणांचा मृत्यु झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एका हल्लेखोराने आज (शुक्रवारी) 'जुम्मे की नमाज' वेळी स्वत:ला स्फोटकांनी उडवून घेतले.
वृत्तसंस्था 'रॉयटर्स'ला एका प्रत्यक्षदर्शीने ‍दिलेल्या माहितीनुसार, कातिफ प्रांतातील अल-कदीह येथील इमाम अली मशिदीत हा स्फोट झाला. हल्ला झाला तेव्हा मशिदीत 150 लोक नमाज अदा करत होते. या हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. स्थानिक वृत्तपत्रांच्या वेबसाइट्‍सवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहांची छायाचित्रे अपलोड केली आहेत. सऊदी अरब सरकारने देखील या हल्ल्याची वृत्ताला दुजोरा दिला आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही.

दरम्यान, कातिफ हा प्रांत शिया बहुल असून एकूण लोकसंख्येच्या 10-15 टक्के शिया समुदाय आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...