आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अफगाणिस्तान संसदेवर दहशतवादी हल्ला, 6 ठार तर 30 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अफगाण पोलिसांनी तालिबान दहशतवाद्यांच्या खात्मा करुन संसदेवर नियंत्रण मिळवले. - Divya Marathi
अफगाण पोलिसांनी तालिबान दहशतवाद्यांच्या खात्मा करुन संसदेवर नियंत्रण मिळवले.
काबूल - अफगाणिस्तानच्या संसदेवर सोमवारी आत्मघातकी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात सात आत्मघातकी स्फोट झाले असून त्यापैकी सहा संसदेच्या बाहेर तर एक स्फोट संसदेच्या आत झाला. या हल्ल्यात 6 लोक ठार तर 30 जखमी झाले. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. स्फोटाच्या दोन तासानंतर काबूल पोलिसांनी सिक्युरिटी ऑपरेशनमध्‍ये सहा हल्लेखोर आणि एक आत्मघाती दहशतवाद्याला मारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. संसद परिसरातील गोळीबार बंद झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
प्राथमिक वृत्तानुसार, संसदेवर चार-पाच दहशतवाद्यांनी हल्ला चढवला होता. त्यातील सर्वच दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. आता गोळीबार बंद झाला आहे. यापूर्वी सुरक्षा दलाने संसद भवनाला घेरले होते. बॉम्बस्फोट झाल्यानंतर सर्व खासदार आणि पत्रकारांना संसदेतून सुरक्षित बाहेर काढण्‍यात आले आहे. अल-जझीराचे पत्रकार जे‍निफर ग्लासीने सांगितले, की स्फोटादरम्यान संसदेचे काम चालू होते. सभापती सभागृहाला संबोधित करीत होते. स्फोट होताच प्रसारण करणारे कॅमेरे हलले. पळापळ सुरु झाली.
पुढील स्लाइडस्वर पाहा, हल्ल्यासंदर्भातील PHOTO