आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suicide Blast Outside Indian Consulate Gate In Afghanistan\'s Jalalabad

अफगाणिस्तान: भारतीय दूतावासाबाहेर आत्मघाती हल्ला, 5 दहशतवादी ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय दुतावासाबाहेर झालेल्या हल्ल्यानंतरचे दृष्य - Divya Marathi
भारतीय दुतावासाबाहेर झालेल्या हल्ल्यानंतरचे दृष्य
जलालाबाद - अफगाणिस्तानच्या जलालाबादमध्ये बुधवारी भारतीय दूतावासाबाहेर आत्मघाती हल्ला झाला आहे. हल्ला करणाऱ्या पाचही दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती आहे. हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी, महिलेसह 19 जण जखमी झाले. आयटीबीपी आणि अफगाण सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना जशासतसे उत्तर दिले.

- दूतावासाबाहेरील गेटजवळ एका दहशतवाद्याने स्वतःला स्फोटकांनी उडवून दिले.
- त्यानंत परिसरात अनेक स्फोट झाले आणि जोरादार गोळीबार करण्यात आला.
- दरम्यान अफगाण सुरक्षा रक्षक आणि आयटीबीपीच्या जवानांनी मोर्चा सांभाळला.
- वृत्तसंस्था पझव्होकच्या वृत्तानुसार, दोन हेलिकॉप्टर्स पेट्रोलिंग करत आहेत.
- स्फोटानंतर भारत आणि पाकिस्तान दुतावासाकडे येणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.
- एमईएने ट्विट करुन सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.

जानेवारी मध्ये 4 मोठे हल्ले
- 19 जानेवारी रोजी काबूलमध्ये रशियन अॅम्बसीसमोर तालिबानकडून एक आत्मघाती हल्ला झाला होता. त्यात चार महिलांसह सात लोक मारले गेले होते. जिथे हा हल्ला झाला होता, त्याच्या जवळच संसद आहे.
- 13 जानेवारीला जलालाबादमध्ये आत्मघाती हल्ला करुन पाकिस्तान दुतावासाला लक्ष्य करण्यात आले होते. त्यात दोन पोलिसांसह अफगाण फोर्सचे 7 सैनिक ठार झाले होते. आयएसआयएसने हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती.
- 3 जानेवारीला भारतीय दुतावासावर दहशतवादी हल्ला झाला होता. चार दहशतवाद्यांनी मृत्यूआधी दुतावासाच्या भिंतीवर रक्ताने नारे लिहिले होते. एक घोषणा होती, 'अफझल गुरुचा बदला.' दुसऱ्या ठिकाणी लिहिलेले होते, 'एक शहीद आणि हजार आत्मघाती'.
- 25 तास चाललेल्या एन्काउंटर नंतर चारही दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले होते.

आधी दोन वेळा हल्ला केव्हा
- काबुलमधील भारतीय दुतावासावर 2008 आणि 2009 मध्येही हल्ले झाले होते.
- दुसरीकडे, 2014 मध्ये हेरात येथे भारतीय दुतावासाला लक्ष्य केले होते.
- त्याआधी भारतीय दुतावासावर झालल्या हल्ल्यात 9 जण ठार झाले होते.
पुढील स्लाइडमध्ये, असे आहे हल्ल्यानंतरचे दृष्य