आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूलमध्ये नाटोच्या छावणीवर बॉम्बहल्ला; 8 नागरिक ठार, 3 सैनिक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल - काबूल येथील नाटोच्या छावणीवर  शक्तिशाली बॉम्बहल्ला करण्यात आला. यामध्ये किमान ८ जणांच्या मृत्यूची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या या स्फोटामध्ये २५ जण जबर जखमी झाले. जखमींमध्ये संयुक्त फौजांमधील ३ सैनिकांचा समावेश आहे. हा हल्ला सकाळी करण्यात आला. अमेरिकन दूतावास आणि नाटो मुख्यालयाजवळील रस्त्यावर गर्दीच्या वेळी हा हल्ला करण्यात आला. यामध्ये ठार झालेल्यांत बहुतांश निरपराध नागरिक आहेत, असे गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. नाटोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन सैनिकांवर उपचार सुरू असून त्यांच्या जिवास धोका नाही. अमेरिका आणि अफगाणिस्तान संयुक्त फौजांमधील हे जखमी सैनिक आहेत. अद्याप कोणत्याही गटाने हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली नाही. तालिबान्यांनी हा हल्ला केला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तालीबान्यांविरूद्ध नवी रणनीती आखण्यात येईल.
 
बॉम्बविरोधी वाहनांना उद्ध्वस्त करण्याचा उद्देश :  स्फोटांसाठी इम्प्रूव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइसचा वापर करण्यात आला होता. दोन लष्करी वाहनांचे यामुळे अतोनात नुकसान झाले. माइन रेझिस्टंट अँम्बूश प्रोटेक्टेड व्हेइकल (एमआरएपी) चा वापर आंतरराष्ट्रीय फौजा नित्याने करतात. त्यांना उद्ध्वस्त करण्याचा उद्देश यामागे असू शकतो. टोयाेटा कोरोलामध्ये स्फोटके ठेवण्यात आल्याचे सुरक्षा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 
 
हे वर्ष घातक : जिम मॅटिस : पँटागॉन प्रमुख जिम मॅटिस यांनी गेल्या महिन्यात काबूलला भेट दिली तेव्हा त्यांनी सांगितले होते की, आंतरराष्ट्रीय फौजा आणि स्थानिक सैनिकांसाठी २०१७ हे घातक वर्ष असेल. नाटोच्या फौजा परत घेण्यास जिम यांनी विरोध दर्शवला होता. दरम्यान, नाटोचे अफगाणिस्तानमधील प्रमुख जनरल जॉन निकाेलसन यांनी अधिक कुमक असण्याच्या गरजेवर भर दिला आहे.  
 
अमेरिकन सैनिकांची ८,४०० पथके तैनात :   
अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैनिकांची ८,४०० पथके तैनात आहेत. याशिवाय नाटोची ५००० सैन्य पथके देशात तैनात आहेत. नाटोच्या फौजा प्रामुख्याने प्रशिक्षण, अफगाण फौजांची मदत आणि सल्लागार स्वरूपाची कामे करतात. काही पथके दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये सहभागी असून इसिस आणि अल-कायदाच्या दहशतवाद्यांशी मुकाबला करत आहेत.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...