आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मघातकी हल्ल्यात ४५ जण ठार, सैन्य माघार घेणार नाही; राष्ट्राध्यक्ष माेहंमद बुहारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानो (नायजेरिया) - नायजेरियातील एका बाजारपेठेत दोन महिलांनी केलेल्या आत्मघातकी बाॅम्बहल्ल्यात किमान ४५ जण ठार, तर ३३ जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी ईशान्येकडील प्रदेशात घडली.

मदगाली भागातील कपडा बाजारात ही घटना घडली. हल्ल्यानंतर घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला दावा सुरुवातीला सुरक्षा दलाकडून करण्यात आला होता. हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाकडून घेण्यात आलेली नाही. परंतु बोको हरमने हे स्फोट घडवले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. आत्मघाती हल्लेखोर ग्राहक म्हणून आले होते. हल्ल्यात दोन्ही महिला हल्लेखोरांचा मृत्यू झाला. २०१५ पर्यंत मदगालीवर बोको हरम या संघटनेचे वर्चस्व होते. परंतु अलीकडेच नायजेरियन सैन्याने त्यांना हुसकावले.

सैन्य माघार घेणार नाही
कट्टरवाद्यांनी हा हल्ला केला आहे. हा मूर्खपणा सोडून द्यावा. अशा कृतीतून निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्यांना सैन्य जुमानणार नाही. आता नागरिक दहशतवादाच्या राक्षसाचा नायनाट करतील असे राष्ट्राध्यक्ष माेहंमद बुहारी यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...