आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sultan Of Brunei\'s Son Prince Abdul Malik Gets Married News In Marathi

ROYAL WEDDING: डोक्यापासून पायापर्यंत हिरेजडीत दागिन्यांत सजली नवरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रुनेई- ब्रुनेईचा सुलतान हसन-अल-बोलकिया यांच्या धाकट्या चिरंजिवाचा शाही विवाह नुकताच थाटात पार पडला. 31 वर्षीय प्रिन्स अब्दुल मलिक 22 वर्षीय डेयांग्कू रबी-तुल हिच्या बंधनात अडकला. डेयांग्कू रबी-तुल ही डाटा एनलिस्ट आणि आयटी इन्स्ट्रक्टर आहे.
पाच एप्रिलला सुरु झालेला हा विवाह सोहळा 15 एप्रिलपर्यंत सुरु राहाणार आहे. रविवारी (12 एप्रिल) रिसेप्शन झाले. हसन-अल-बोलकिया जगातील दुसरा सगळ्यात धनाढ्य सुलतान आहे.
राजधानी बंदर सेरी बेगावानमधील दोन वेगवेगळ्या लोकेशन्सवर गेल्या 11 दिवसांपासून हा शाही विवाह सोहळा सुरु आहे. यासोहळ्याला 21 देशातील पाच हजार व्हीव्हीआयपी उपस्थित होते.

डोक्यापासून पायापर्यंत हिरेजडीत दा‍गिन्यात सजली नवरी...
- डोक्यावर रत्नजडीत ताज.
- गळ्यात हिरेजडीत नेकलेस. पेंडलमध्ये तीन महागडे पन्ने.
- अंड्‍याच्या आकारातील दोन पन्ने असलेले ब्रूच.
- सोन्याचे पैजन.
- स्वारोवस्की क्रिस्टल जडीत सॅंडल.

दुसरा सगळ्यात धनाढ्य सुलतान...
- 1788 खोल्यांचा महाल. छताला सोन्याच्या प्लेट्स
- 1.24 लाख कोटी रुपयांचे मालमत्ता
- 7000 गाड्यांचा ताफा
- 600 रॉल्स रॉयस,
- 300 फरारी
- सोन्याचे विमान
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, हिरेजडीत दागिन्यांत सजलेल्या नवरदेव -नवरीचे PHOTOS...