आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंसास : व्हिसा आहे की US मध्ये इलिगली राहताय, आरोपीने फायरिंगपूर्वी विचारले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओलाथे (कंसास) - याठिकाणी एका बारमध्ये फायरिंग करणाऱ्या आरोपी अॅडम पुरिन्टनने दोन्ही भारतीय श्रीनिवास कुचीभोतला आणि आलोक मदसानी यांना त्यांच्या व्हिसाबाबत प्रश्न विचारले होते. मसदानी यांनी फोनवर दिलेल्या एका मुलाखतीत ही माहिती दिली. 22 फेब्रुवारीला कंसासमध्ये गोळीबार झाल्याने कुचीभोतला यांचा मृत्यू झाला होता. त्यात मदसानीसह दोघे जखमी झाले होते. 

तो म्हणाला, अमेरिकेत इलिगली राहात आहात का.. 
- न्यूज एजन्सी एएनआयनुसार मसदानी यांनी द न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, पुरिन्टन याने सध्या आमचा व्हिसा सुरू आहे की, आम्ही इलिगली अमेरिकेत राहतोय असे विचारले होते. 
- मसदानी यांच्यामते, पुरिन्टन याच्या प्रश्नांना आम्ही काहीही उत्तर दिले नाही. लोकही यावेळी काहीतरी भलतेच बोलत होते. पण त्याने हे प्रकरण इथेच थांबवले नाही. 
- कुचीभोतला आणि मसदानी यांनी अमेरिकेतूनच शिक्षण घेतले होते आणि दोघेही लिगली त्याठिकाणी राहत होते. 

काय म्हणाले आयव्हिटनेस ?
- घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले की, पुरिन्टन दोनों भारतीयांबाबत वर्णद्वेषी वक्तव्य करत होता. त्यांचा अमेरिकेशी काहीही संबंध नाही, असेही तो म्हणाला. 
- मसदानी यांनी सांगितले की, मी मॅनेजरकडे गेलो आणि याबाबत तक्रार केली, त्यानंतर आरोपीला बारच्या बाहेर हाकलून देण्यात आले. 
- अधिकाऱ्यांच्या मते, काही वेळाने पुरिन्टन बाहेरून परत आला आणि दोन्ही भारतीयांवर गोळीबार केला. 24 वर्षांच्या इयान ग्रिलटने दोन्ही भारतीयांचा वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तोही जखमी झाला. 

अल्पसंख्यांकांत भिती : सुनैना 
- यावेळी बोलताना सुनैय म्हणाल्या की, अमेरिकेत भेदभावाचे रिपोर्ट्स पाहून अल्पसंख्याकांच्या मनात भिती बसली आहे. अमेरिकेत राहावे की नाही, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. 
- हेट क्राइममध्ये झालेल्या गोळीबाराबाबत ऐकून मला काळजी व्हायची. मी नवऱ्याला विचारत होते, तर ते मला नेहमी समजवायचे. 
- पण अमेरिकेच्या सरकारने हे सर्व थांबवण्यासाठी काय केले हेच मला कळत नाही. 
- श्रीनिवास यांचे तुलत भाऊ कृष्ण मोहन यांनी सांगितले की, श्रीनिवासन यांचे लग्न 4 वर्षांपूर्वी झाले होते. त्यांचे मॅनेजर त्यांच्या कामाचे कौतुक करतायचे. 

वर्णद्वेषातून होणाऱ्या हिंसाचारात 115% वाढ 
- न्यूयॉर्क पोलिस डिपार्टमेंटनुसार ट्रम्प यांच्या विजयानंतर हेट क्राइममध्ये 115% वाढ झाली आहे. 
- ट्रम्पच्या विजयानंतर 10 दिवसांतच हेट क्राइमची 867 प्रकरणे दाखल जाली होती. 
- काऊंसिल ऑफ अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्सनुसार गेल्यावर्षी सुमारे 400 हेट क्राइम नोंदवण्यात आले होते. यावर्षी दोन महिन्यांतच 175 प्रकरणे समोर आली आहेत. 

ट्रम्प हेच जबाबदार 
- श्रीनिवास यांचे चुलत भाऊ वेणू माधव यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, हा हेट क्राइममधून झालेला हल्ला आहे. मीही अमेरिकेत काम करतो, त्यामुळे मला माहिती आहे. ट्रम्प आल्यानंतर वर्णद्वेषी हल्ले वाढले आहेत. आधी असे होत नव्हते. 
- श्रीनिवास यांच्या इतर नातेवाईकांनी सांगितले की, अमेरिकेत प्रथमच एखाद्या भारतीय कुटुंबाबरोबर अशी घटना घडली आहे. त्याचे कारण फक्त ट्रम्प हेच आहेत. 

सुषमा म्हणाल्या, मला धक्का बसला 
- सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी या प्रकरणी ट्वीट केले. कंसासमध्ये झालेल्या शुटिंगच्या घटनेचा धक्का बसल्याचे त्या म्हणाल्या. या हल्ल्यात श्रीनिवास यांचा मृत्यू झाला. मी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर दुःखात सहभागी आहे. 
 
पुढील स्लाइडवर व्हिडीओतून पाहा काय म्हणाल्या सुनैना, इतर स्लाइड्सवर पाहा VIDEO
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...