आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम समुदायाला पाठिंबा द्यावा : सुंदर पिचाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांच्यानंतर गुगलचे भारतीय वंशाचे प्रमुख सुंदर पिचाई यांनीही मुस्लिमांसह अल्पसंख्याक समुदायाची पाठराखण करायला हवी, असे ठाम मत व्यक्त केले आहे.

कंपनीत सर्व समुदायाच्या मतांचा आदर केला गेला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. मुस्लिमांना देशात प्रवेश बंदी करावी, या डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही कंपन्यांच्या प्रमुखांच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिका आहे. परंतु प्रतिनिधित्व कमी असलेल्या समुदायालादेखील हा अधिकार आहे. म्हणूनच त्यांनीदेखील आपले म्हणणे मांडले पाहिजे.
त्यामुळेच मुस्लिम तसेच अल्पसंख्याक समुदायाला अमेरिका आणि जगभरात आपण सर्वांना पाठिंबा दिला पाहिजे. झुकेरबर्ग यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्याचे मी देखील समर्थन करतो.