आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन: \'डॉग मीट फेस्टिव्‍हल\'मध्‍ये मारण्‍यात येतील 10 हजार कुत्री, लोकांचा विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूलिन सिटी- चीनच्‍या ग्वांग्सी प्रांतातील यूलिन सिटीमध्‍ये होणा-या डॉग मीट फेस्टिव्‍हलवर बंदी घालण्‍याची मागणी सुरू झाली आहे. 10 दिवस चालणा-या या फेस्टिव्‍हलमध्‍ये दरवर्षी हजारो निष्‍पाप कुत्र्यांना ठार मारण्‍यात येते. नुकताच यासंदर्भातील एक सर्व्‍हे करण्‍यात आला आहे. त्‍यामध्‍ये चीनमधील 64 टक्‍के लोक या फेस्टिव्‍हलच्‍या विरोधात असल्‍याचे लक्षात आले. 1 कोटी 10 लाखाहून अधिक लोकांची मागणी आहे की, या फेस्‍टिव्‍हलवर बंदी घालण्‍यात यावी. सोमवारपासून सुरू झालेल्‍या या फेस्‍टिव्‍हलमध्‍ये यावेळी 10 हजारहून अधिक कुत्र्यांना ठार मारण्‍यात येणार आहे. कुत्र्यांना कित्‍येक दिवस उपाशी ठेवले जाते..
- 21 जून 2009 पासून पर्यटनाला चालना देण्‍यासाठी या कार्यक्रमाची सुरूवात करण्‍यात आली.
- तेव्‍हापासून दरवर्षी चीनमध्‍ये हा कार्यक्रम मोठ्या उत्‍साहात साजरा केला जात आहे.
- चीनमधील विविध भागांमधील कुत्र्यांना एकत्र करुन येथे एका पिंज-यात बंद केले जाते.
- या कुत्र्यांना अन्‍न आणि पाणीही दिले जात नाही.
- फेस्‍टिव्‍हलमध्‍ये जमलेल्‍या लोकांसमोर या कुत्र्यांना ठार मारले जाते.
- सर्व्‍हेनुसार, हा उत्‍सव चीनच्‍या प्रतिमेला नुकसान पोहोचवणारा असल्‍याचे लोक म्‍हणतात.
- सर्व्‍हेत 51.7 टक्‍के लोकांनी कुत्र्याच्‍या मासावर कायमस्‍वरुपी बंदी आणण्‍याची मागणी केली.
- 69.5 टक्‍के लोकांनी दावा केला आहे की, त्‍यांनी कधी कुत्र्याचे मास सेवन केले नाही.
पुढील स्‍लाइड्सवरील फोटोंमध्‍ये पाहा, असा असतो हा फेस्‍टिव्‍हल..
यूलिन सिटीमध्‍ये दररोज कापले जातात 300 कुत्री, मांजरी.. प्राण्‍यांचे असे केले जातात हाल..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...