आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरताज अजीज यांना भेटल्‍या सुषमा, 27 ला संयुक्‍त तपास पथक येईल भारतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोखरा- नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांनी सुषमा स्‍वराज यांची भेट घेतली. चर्चेनंतर दोन्‍ही नेत्‍यांनी माध्‍यमांना माहिती दिली. सुषमा म्‍हणाल्‍या पठाणकोट हल्‍ल्याच्‍या तपासासाठी संयुक्त तपास पथक 27 मार्चला भारतात येणार आहे. अजीज म्‍हणाले की, 31 मार्चला वॉशिंग्टनमध्‍ये नवाझ शरीफ आणि नरेंद्र मोदी यांच्‍यात चर्चा होऊ शकते. मोदींना केले निमंत्रित..
- सरताज अजीज म्‍हणाले मोदींना सार्क शिखर परिषदेसाठी पाकमध्‍ये येण्‍याची निमंत्रण पत्रिका सुषमा स्‍वराज यांच्‍याकडे दिली आहे.
- या वर्षी सप्‍टेंबर महिन्‍यात 'सार्क' राष्ट्रांची शिखर परिषद इस्लामाबादमध्ये होते आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमामध्‍ये सहभागी होण्‍याची शक्‍यता आहे.
बैठकीनंतर सुषमा काय म्‍हणाल्‍या?
- सुषमा म्‍हणाल्‍या, 'या वेळी सार्क परिषदेत सद्भावनेचे वातावरण राहील.'
- जेव्‍हा मी आणि सरताज साहेब भेटलो. तेव्‍हा पठाणकोटवर चर्चा होणारच होती.
- 27 मार्चला रात्री संयुक्‍त तपास पथक भारतात पोहोचेल, असे बैठकीत ठरले.
- 28 मार्चला हे पथक त्‍यांचे काम करणार आहे.
सरताज अजीज म्‍हणाले?
- सरताज अजीज म्‍हणाले, 'मी नरेंद्र मोदी यांना इस्लामाबादमध्‍ये होणा-या सार्क परिषदेचे निमंत्रण दिले आहे.'
- 'जेवढेही प्रश्‍न प्रलंबित असतील त्‍यावर यावेळी चांगली चर्चा होईल, अशी आशा आहे.'
- ते म्‍हणाले, 'पठाणकोट प्रकरणामुळे दोन्‍ही देशांमधील व्‍यापक संवाद थांबला होता. मात्र, दोघांमधील संबंध सुधारतील असा विश्‍वास आहे.'
- 'पंतप्रधान मोदी आणि नवाझ शरीफ यांच्‍यात 31 मार्चला वॉशिंग्टनमध्‍ये चर्चा होइल असे वाटते.'
बातम्या आणखी आहेत...