आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरेकी पोसण्याचा काही देशांना छंद; तेच दहशतवाद पेरतात, पिकवतात, विकतातही!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र - संयुक्त राष्ट्रात काश्मीर राग आळवणारे पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफांना सडेतोड उत्तर मिळाले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी दिलेल्या २० मिनिटांच्या भाषणात १० मिनिटे केवळ पाकिस्तान व दहशतवादावर खर्ची घातले. त्यांनी भारताआधी न्यूयॉर्क, पॅरिस, ढाका, इस्तंबूल, ब्रुसेल्स व काबूल हल्ल्यांचा हवाला दिला व या हल्ल्यांमागे पाकचा हात असल्याचे ठणकावले. त्या म्हणाल्या, दहशतवाद मानवी हक्कांचे सर्वात मोठे उल्लंघन आहे. आधी तो तुकड्यांत होता. आता एकजीव राक्षस बनला. अतिरेक्यांचा मदतकर्ता कोण आहे हे पाहावे लागेल. काही देश दहशतवाद पेरतात, पिकवतात, विकतात व निर्यात करतात. त्यांना दहशतवाद पोसण्याचा शौक आहे. त्यांना वेगळे पाडावे लागेल.
काँग्रेसने हेे निवेदन लेचेपेचे असल्याचे म्हटले. स्वराज पाकला दहशतवादी राष्ट्र संबोधतील अशी अपेक्षा होती. तसे झाले नाही, असे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले.
नाव घेण्याआधी ३ मिनिटे पाकचा अप्रत्यक्ष उल्लेख
{आमच्यात असे देश आहेत की तेथे यूएनने घोषित केलेले अतिरेकी मुक्त वावरत आहेत. भयमुक्तपणे विषारी भाषणे देत आहेत.
- इशारा हाफिज सईदच्या दिशेने
{या अतिरेक्यांच्या मागे कोण आहे? त्यांना पैसे व शस्त्रे कोण देतो? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अफगाणने हा प्रश्न आधीच केला आहे.
- इशारा केवळ पाकच्या दिशेने
रक्त व पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही : मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सिंधू जल कराराचा आढावा घेतला. ते म्हणाले, रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही. असे करार एकपक्षीय नसतात. त्यासाठी विश्वास व सहकार्य आवश्यक असते. या करारानुसार सिंधू, झेलम व चिनाब नदीचे ८०% पाणी पाकिस्तानला मिळते.
शरीफांचे तीन आरोप आणि सुषमा स्वराजांचे उत्तर

1 शरीफ : काश्मिरात मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे.
सुषमा : ज्यांची घरे काचेची त्यांनी दुसऱ्या घरांवर दगड फेकू नयेत. बलुचिस्तान पाहा
मी पाकच्या पंतप्रधानांना सांगू इच्छिते, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगड मारू नये. बलुचिस्तानचे लोक मानवी हक्कांसाठी लढत आहेत. त्यांचा छळ सुरू आहे.
2 शरीफ : भारत प्रत्येक चर्चेसाठी अटी ठेवतो...
सुषमा : आमचे पीएम लाहोरला गेले, बदल्यात काय मिळाले..उरी, पठाणकोट!
सांगा, पीएम मोदींनी कोणत्या अटी घातल्या होत्या, जेव्हा तुम्हाला आपल्या शपथविधीला बोलावले. काबूलहून परतताना लाहोरला गेले. भारताने मैत्रीचा हात पुढे केला. त्या बदल्यात काय मिळाले? उरी व पठाणकोटसारखे हल्ले!
3 शरीफ : कश्मीरचा युवा नेता बुरहाणला ठार मारले
सुषमा: पाकने काश्मीरचे स्वप्न पाहणे सोडावे, तो आमचा आहे.. आमचाच राहील !
पाकिस्तानने स्वप्न पाहणे सोडावे. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. तेथे पाकिस्तानचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. सीमेपलीकडून पाठवलेला त्यांचा अतिरेकी बहादूर अली दहशतवादाचे जिवंत उदाहरण आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...