आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही डॉक्टर-शास्त्रज्ञ घडवले, पाकने अतिरेकी निर्माण केले; सुष्‍मांनी सुनावले पाकला खडेबोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सलग तिसऱ्या वर्षी संयुक्त राष्ट्र आमसभेत हिंदीत भाषण केले. सुमारे २२ मिनिटांच्या भाषणात त्यांनी १० मिनिटे दहशतवाद व ६ मिनिटे पाकिस्तानवर प्रहार केला. त्या म्हणाल्या, भारताने आयआयटी, आयआयएम स्थापले. एम्ससारखी रुग्णालये उभारली. अंतराळ क्षेत्रात आंतरराष्ट्रीय संस्था स्थापल्या. मात्र, पाकिस्तानने काय उभारले? त्यांनी लष्कर-ए-ताेयबा स्थापली, जैश-ए-मोहंमद, हक्कानी नेटवर्क, हिजबुल मुजाहिदीन उभारले. अतिरेकी आश्रयस्थाने व अतिरेकी कॅम्प उभारले. आम्ही विद्वतजन, वैज्ञानिक, अभियंते, डॉक्टर निर्माण केले. त्यांनी दहशतवादी निर्माण केले. डॉक्टर मरणाऱ्यांचे प्राण वाचवतात व जिहादी जिवंतांना मारतात. आम्ही गरिबीशी लढतोय, मात्र शेजारी पाकिस्तान आमच्याशी लढतोय. स्वराज यांनी यूएनवरही नेम साधत यात बदलांवर भर दिला. 

सुषमांनी भाषणाची सुरुवात नमस्काराने व समारोप सर्वे भवंतु सुखिन: सर्वे संतु निरामया। सर्वे भद्राणि पश्यंतु मां कश्चि दख भागभवेत् या श्लोकाने केला. त्यांच्या भाषणादरम्यान सभागृह दोन वेळा टाळ्यांनी दणाणले. त्यांना उभे राहून सलामी देण्यात अाली. 
 
२२ मिनिटांच्या भाषणात १० मिनिटे दहशतवाद आणि ६ मिनिटे पाकवर प्रहार
१. पाक पीएमवर हल्ला : पाकचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासींनी भारतावर अनेक आरोप केले. राष्ट्र पुरस्कृत दहशतवाद पसरवल्याचा अारोप केला. भारत-पाक एकाच वेळी स्वतंत्र झाले होते. आज जगात भारताची ओळख आयटी सुपरपॉवर, तर पाकची दहशतवादी राष्ट्र अशी बनली आहे. 
का : पाक पीएम म्हणाले होते, भारत त्यांच्या देशात दहशतवाद पसरवतोय. आम्हीच सर्वाधिक पीडित आहोत. 
२. मोदींनी मैत्रीचा हात दिला : जिनांनी मैत्रीचा वारसा दिला की नाही, हे इतिहासाला ठाऊक. मात्र, आमचे पीएम मोदी यांनी मैत्रीसाठी  हात दिला.मीठ कुणी कालवले, हे तुम्हीच सांगा. सिमला करार व लाहोर घोषणापत्रांतर्गत प्रत्येक मुद्दा द्विपक्षीय चर्चेतून सोडवायचा असे ठरले होते. तिसऱ्याचा हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही.  
का : पाक पीएम म्हणाले होते की, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांनुसार जम्मू-काश्मिरात सार्वमत घेण्यात यावे. यूएनने विशेष दूत नियुक्त करावा.
३. द्विपक्षीय चर्चेबाबत : ९ डिसेंबर २०१५ ला हार्ट अॉफ एशिया परिषदेत मी इस्लामाबादेत गेल्यानंतर नव्याने समग्र द्विपक्षीय चर्चा सुरू करण्याचे ठरले होते. द्विपक्षीय शब्द त्यात सहेतुकपणे टाकला होता. मात्र तो सिलसिला कायम राहिला नाही. अब्बासी साहब यासाठी तुम्ही जबाबदार आहात, मी नव्हे. 
का : पाक पीएमने आरोप केला होता की, आम्ही द्विपक्षीय चर्चा करू इच्छितो, भारत एेकत नाही.
४. शेकडो निरागस लोकांचे प्राण घेणारे आज येथे आम्हाला मानवतेच्या गोष्टी शिकवत आहेत. पाक जो पैसा दहशतवादावर खर्च करत आहे ताे देशाच्या, जनतेच्या विकासासाठी लावला तर जगाची दहशतवादापासून सुटका होईल. त्यांच्या देशाचाही विकास होईल. 
का : भारत वेगाने विकास करत आहे. तर, पाक दहशतवादी घटवण्याच्या मागे आहे. २०१६-१७मध्ये भारताचा विकास दर ७.१ टक्के होता, तर पाकचा ४.७ टक्के.
५. पाकिस्तान मानवी हक्कांचे उपदेश आम्हाला देत आहे. पाकिस्तानने तर राक्षसी वृत्तीची हद्दच ओलांडली आहे.
का : पाक पीएमनी आरोप केला होता की, काश्मीरमधील आंदोलन चिरडण्यासाठी भारताने ७ लाख सैनिक तैनात केले आहेत. पॅलेट गन्सही हजारो काश्मिरी व त्यांच्या मुलांना अंध-अपंग केले आहे.
६. इतर देशांवरही टीका : पूर्वी जगभरातील देश दहशतवादाला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून टाळत होते. आता सर्वच चर्चा करतात. यावर आत्मचिंतनाची गरज आहे. संयुक्त वक्तव्य जारी केले जाते, दहशतवादाशी लढण्याच्या आणा-भाका घेतात. मात्र, संकल्प सिद्धीस नेण्याची वेळ येते तेव्हा काही देश आपला फायदा पाहून भूमिका बदलतात.
का : संयुक्त राष्ट्रसंघाचे अधिवेशन असो किंवा ब्रिक्स, जी-२० परिषद, प्रत्येक वेळी दहशतवादावर चर्चा होते. ठोस निर्णय घेतला जात नाही.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...