आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळचे फॉदर टॉम यांना IS च्या तावडीतून मुक्त केले, सुषमा स्वराज यांचे ट्वीट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्यांचे अदेन येथील अनाथाश्रमावरून अपहरण झाले होते. - Divya Marathi
त्यांचे अदेन येथील अनाथाश्रमावरून अपहरण झाले होते.
ओमान / नवी दिल्ली - जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना आयएसच्या तावडीतून केरळचे फॉदर टॉम उजहूनालिल यांना सुखरूप मुक्त करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी ट्वीट करून ही माहिती जाहीर केली आहे. ओमानच्या ऑब्जर्वरने दिलेल्या माहितीप्रमाणे, फादर टॉम यांना मस्कतला रवाना करण्यात आले आहे. तेथूनच टॉम यांना केरळच्या दिशेने पाठवले जाणार आहे. ईश्वराचे आभार मानताना त्यांनी आपल्या भाऊ-बहिण आणि मित्र-परिवाराला लवकरात लवकर भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आयएसने त्यांचे 4 मार्च 2016 रोजी अपहरण केले होते. 
 
 
सुषमांनी दिले होते सुटकेचे आश्वासन
गेल्या महिन्यात केरळच्या एका प्रतिनिधी मंडळाने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. तसेच फॉदर टॉम यांच्या सुटकेची मागणी केली होती. त्यावेळी सुषमा यांनी टॉम यांची लवकरात लवकर सुटका करण्याचे आश्वासन दिले होते. टॉम सुखरूप असल्याचे सुद्धा त्यावेळी परराष्ट्र मंत्री म्हणाल्या होत्या.
 

2010 मध्ये पाठवले होते येमेनला
- चर्चने फॉदर टॉम यांना 2010 मध्ये येमेनला पाठवले होते. उजहूनालिल कुडुम्ब योगमचे खजिनदार आहेत. 5 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर चर्चने त्यांना तेथेच थांबण्यास सांगितले होते. तोपर्यंत त्यांना दुसऱ्या ठिकाणी नव्या जबाबदारीवर पाठवण्याची तयारी सुरू होती. 
- फॉदर टॉम केरळच्या कोयट्टम जिल्ह्यातील रामापुरम येथील रहिवासी आहेत. 
 

ओल्ड एज होमवरून अपहरण
- फॉदर टॉम यांचे 4 मार्च 2016 रोजी अदेन येथील ओल्ड एज होमवरपून अपहरण करण्यात आले होते. याच ठिकाणी दहशतवाद्यांनी 15 जणांचा नरसंहार केला होता. 
- अपहरणानंतर त्यांनी दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त करण्याचे आवाहन करताना एक व्हिडिओ देखील जाहीर केला होता. त्यामध्ये ते माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, नरेंद्र मोदी, पोप फ्रान्सिस आणि ख्रिश्चियन कम्युनिटीकडून मदत मागत होते. 
बातम्या आणखी आहेत...