आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायझेरियामध्ये मशिदीत आत्मघातकी हल्ला; 22 जणांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेदुगुरी- नायझेरियातील मेदुगुरी शहर बुधवारी एका आत्मघातकी हल्ल्याने हादरले. मशिदीत हा स्फोट झाला. स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. दहशतवादी संघटना बोको हरमचा या हल्ल्या मागे हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

स्फोट झालेल्या भागात नायझेरियन आर्मीचे कमांड सेंटर
- मेदुगुरी शहरातील उमरारी भागातील एका मशिदीत हा हल्ला झाला.
- हल्लेखोर महिलांनी स्फोटकांसह मशिदीत प्रवेश केला. त्यानंतर त्यापैकी एकीने स्वत:ला उडवून घेतले. लोक बाहेर धावत सुटताच दुसर्‍या महिलेनेही स्वत:ला उडवून घेतले.
- हल्ला झाला त्या परिसरात नायझेरियन आर्मीचे कमांड सेंटर आहे.
- आर्मीने बोको हरमविरुद्ध कॅम्पेन सुरु केले आहे.

28 डिसेंबरला झालेल्या हल्ल्यात 50 ठार
- मेदुगुरीमध्ये गेल्या वर्षी 28 डिसेंबरला बोको हरमने रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड व सीरियल सुसाइड ब्लास्ट केला होता. यात 50 जणांचा मृत्यू झाला होता.
- या हल्लातही बोको हरमने महिला सुसाइड बॉम्बर्सचा वापर केला होता.

बोको हरम?
- बोको हरम हा नायझेरियातील दहशतवादी संघटना आहे.
- पूर्व नायझेरिया बोको हरमचा गड मानला जातो.
- अबु बकर शेकू हा या संघटनेचा म्होरक्या आहे.
- बोको हरमला ISIS चा पाठिंबा मिळाला आहे.
- नायझेरियाला इस्लामिक स्टेट बनवण्याच्या विचारात आहे.
- बोको हरम ख्रिश्चन व सरकारी कार्यालयांवर हल्ले करते.

बातम्या आणखी आहेत...