आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KFCच्या फूडमध्ये आढळले \'ब्रेन\', सोशल मीडियात फोटो झाला Viral

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल फोरम \'रेडिट\'वर शेअर झालेले छायाचित्र, केएफसी फूडमध्ये तथाकथित ब्रेन (मेंदू) आढळल्याचे म्हटले आहे - Divya Marathi
सोशल फोरम \'रेडिट\'वर शेअर झालेले छायाचित्र, केएफसी फूडमध्ये तथाकथित ब्रेन (मेंदू) आढळल्याचे म्हटले आहे
कॅलिफोर्निया- अमेरिकन फास्ट फूड चेन 'केएफसी' पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. सोशल फोरम 'रेडिट'वर एका युजरने एक छायाचित्र पोस्ट केले आहे. केएफसी फूडमध्ये चिकनचा मेंदू आढळल्याचा दावा 'blergmonkeys' नामक युजरने केला आहे. आतापर्यंत 90 हजार युजर्सनी हे छायाचित्र पाहिले आहे.

'blergmonkeys' ने शेअर केलेल्या छायाचित्रावर अनेक युजर्सनी तिखट प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. काही युजर्सनी तर केएफसीला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. मात्र, छायाचित्रात दिसत असलेला ब्रेन नसून चिकनच्या किडनीचा भाग असल्याचे एका युजर्सने म्हटले आहे.

'IKLYSP' नामक युजरने लिहिले आहे की, 'छायाचित्रात दिसत असलेला पदार्थ चिकनचा मेंदू नसून तो किडनीचा भाग आहे. चिकनला बॅकबोनजवळ किडनी असते. चिकन स्वच्छ करताना आपण ते पाहिले असल्याचे 'IKLYSP'ने म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केएफसी फूडशी संबंधित एक छायाचित्र पोस्ट करण्‍यात आले होते. छायाचित्रातील पदार्थाला 'फ्राइड रॅट' (तळलेला उंदीर) म्हटले होते. केएफसीने याबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर ते फ्राइड रॅट नसल्याचे स्पष्ट झाले होते. युजरने चिकनचे दोन तुकडे एकावर एक ठेवून छायाचित्र घेतले होते. नंतर ते सोशल मीडियावर शेअर केेले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, केएफसी संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...