आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात वाढलेल्या स्यू की देणार चीन संबंधांवर भर, म्हणाल्या म्यानमारचा कोणीही शत्रू नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यांगून- भारतात लहानाच्या मोठ्या झालेल्या आँग सान स्यू की यांनी म्यान्मारची सत्ता हाती घेतल्यानंतर आपला पक्ष चीनसोबतच्या संबंधांवर जास्त आणि विशेष लक्ष देईल, असे म्हटले आहे. देशाला विकासासाठी विदेशी गुंतवणुकीची आवश्यकता आहे. ही गरज चीनकडून भागवली जाऊ शकते.
चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआला दिलेल्या मुलाखतीत एनएलडी (नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी) नेत्या स्यू की म्हणाल्या, म्यानमारचा कोणीही शत्रू नाही. मात्र, अन्य देशांपेक्षा शेजारी देशांशी संबंध जास्त संवेदनशील आहेत. त्यामुळे काळजी घ्यावी लागेल. पाश्चिमात्य देशांनी लावलेल्या निर्बंधावेळी चीननेच म्यान्मारची मदत केली आहे. पाश्चिमात्य देशांकडून अद्यापही गुंतवणुकीची आवश्यकता नाही. म्यान्मारमध्ये प्रामुख्याने चीनची गुंतवणूक आजवर लोकप्रिय राहिली नाही. त्यांनी भ्रष्टाचार, जमिनीचा कब्जा, बनावट सौदे, नैसर्गिक स्रोतांचा बेसुमार वापर केला.
पुढील स्लाइड्सवर वाचा कोण आहेत स्यू की