आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्यानमार अध्यक्षपदी क्याव यांची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नैपिताव (म्यानमार) - म्यानमारमधील नेत्या आंग सान स्यू की यांचे विश्वासू सहकारी तिन क्याव यांची देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली. तिन यांचे नाव या पदासाठी जाहीर केल्यानंतर संसदेतील कनिष्ठ सभागृहात मतदान होऊन त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) या पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. त्यामुळे स्यू की यांनी अध्यक्षपदासाठी नाव सुचविलेल्या तिन यांना सभागृहात विजय मिळविणे सहज साध्य झाले.
बातम्या आणखी आहेत...