आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत फ्रान्सकडून खरेदी करणार 36 राफेल लढाऊ विमाने, सुब्रमण्यम स्वामींचा विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस/नवी दिल्ली - भारत सरकारने फ्रान्सच्या कंपनीकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याची तयारी केली आहे. दोन्ही देशांमध्ये राफेल लढाऊ विमानांचा करार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना भारताला विमाने लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचा आग्रह केला आहे. भारताला लढाऊ विमानांची मोठी गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान राफेल लढाऊ विमाने देशात आणण्याची घाई करत आहे, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या कराराला विरोध केला आहे. राफेल लढाऊ विमान कराराविरोधात कोर्टाचे दार ठोठावण्याची त्यांनी तयारी केली आहे.

स्वामींनी मोदींना दिला इशारा
शुक्रवारी एक निवदेन जारी करुन भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राफेल लढाऊ विमान करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, की लिबीया आणि इजिप्तमध्ये राफेल जेट विमाने यशस्वी ठरलेले नाही, मग भारत त्यांची तातडीने खरेदी का करत आहे. स्वामी म्हणाले, 'जर पंतप्रधान मोदींकडे हा करार करण्याशिवाय पर्याय नसेल तर माझ्याकडे कोर्टात पीआयएल दाखल करण्याशिवाय पर्याय उरत नाही.'

दिवाळखोरीत निघणार आहे राफेलची निर्मीती करणारी कंपनी
स्वामी म्हणाले, की राफेल लढाऊ विमानांना मोठ्या प्रमाणात इंधन लागते, एकेही देश ही विमाने खरेदी करण्यास उत्सूक नाहीत. असे असताना भारताने या विमानांच्या खरेदी का घाई केली आहे. स्वामी म्हणाले, की अनेक देशांनी राफेल विमाने खरेदी करण्यासाठी याची मुळ कंपनी डेसाल्ट सोबत एमओयू करार केला मात्र नंतर तो देखील रद्द केला होता. यामुळे ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. आपल्याच सरकारला घरचा आहेर देताना भाजप नेते स्वामी म्हणाले, की भारताला फान्सला मदतच करायची असेल तर मग राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यापेक्षा त्यांनी डेसाल्ट कंपनीच खरेदी करावी.

दोन्ही सरकारांमध्ये सरळ करार
राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी भारत चाल बिलीयन डॉलर खर्च करण्यास तयार झाला आहे. राफेल खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे हप्तांमध्ये फेडायचे आहेत. या करारात 'मेक इन इंडिया' आणि तंत्रज्ञान देवाण-घेवाण यासारख्या भाजप सरकारने गवगवा केलेल्या मुद्यांना बाजूला ठवण्यात आले आहे. त्याचे कारण असे सांगितले जात आहे, की भारतीय वायू सेनेला तातडीने लढाऊ विमानांची आवश्यकता आहे. पहिल्या टप्प्यात 18 राफेल भारताला सुपुर्द केले जातील. त्यांचे मेंटनन्स आणि सेवा करारावर दोन्ही देशांची सहमती झाली आहे. भारताला आशा आहे, की राफेल करारानंतर दोन्ही देशांमध्ये 20 बिलयन डॉलरच्या आणखी लढाऊ विमानांचा कराराची बातचीत पुढे सरकेल. या करारानुसार भारत 126 विमाने खरेदी करणार आहे. त्यातील 18 फ्रान्स बनावटीची असतील तर उर्वरित 108 भारतात तयार केले जातील. मात्र या करारात एक पेच आहे. भारतात तयार होणार्‍या 108 विमानांच्या किंमतीत डेसाल्ट कंपनीने भरमसाठ वाढ केली आहे. दुसरे असे की यांच्या मेटनन्सची जाबाबदारी घेण्यास फ्रान्सने नकार दिला आहे.