आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये महिला बुर्किनीसह स्पर्धेत उतरणार, असोसिएशनने केली विनंती मान्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - जलतरण स्पर्धेत मुस्लिम महिलांना यापुढे बुर्किनी अर्थात अंगभर सैल पोशाख परिधान करून सहभागी होता येणार आहे. ब्रिटन सरकारने तशी परवानगी दिली आहे.  

मुस्लिम वुमन्स स्पोर्ट फाउंडेशनने यासंबंधी अमॅच्युअर स्विमिंग असोसिएशनकडे विनंती केली होती. ही विनंती असोसिएशनने मान्य केली. स्विमसूटच्या आपल्या नियमांत शिथिलता आणण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला. त्यामुळे आता मुस्लिम महिलांना अंगभर कपडे परिधान करून जलतरण स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. ऑलिम्पिकमध्येदेखील अशा प्रकारच्या पूर्ण कपड्यांना परिधान करून जलतरणमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. ही परवानगी केवळ इंग्लंडमध्ये होणाऱ्या हौशी स्पर्धांसाठी लागू राहणार आहे.  
 
स्पर्धेपूर्वी सूट परीक्षण  
जलतरण स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकाला स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर रेफरीला आपला पोशाख दाखवावा लागेल. रेफ्री पोशाखाचे परीक्षण करतील. रेफरींनी एकदा परवानगी दिल्यानंतर पुन्हा स्पर्धकाला इतर यंत्रणेकडून परवानगीची गरज भासणार नाही, असे असोसिएशनने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.  
 
प्रत्येकाला सामर्थ्य दाखवण्याची संधी मिळावी
असोसिएशनने घेतलेला हा निर्णय अत्यंत सकारात्मक आहे. प्रत्येकाला आपले सामर्थ्य दाखवण्याची संधी मिळावी. नियमांतील बदलामुळे ही संधी सर्वांना मिळणार आहे. त्यातून नवीन पिढी जलतरणाकडे आकर्षित होऊ शकेल, असा विश्वास ख्रिस 
बोस्टॉक यांनी व्यक्त केला. एसएसएचे ते अध्यक्ष आहेत.  
 
खेळात महिलांचा  सहभाग वाढू लागलाय..
क्रीडा क्षेत्राकडे मुस्लिम महिलांचा सहभाग वेगाने वाढू लागला आहे. क्रीडा क्षेत्रात महिलांना संधी निर्माण करून देण्यासाठी प्रशासनदेखील आता नियमांत शिथिलता आणू लागले आहे. हा निर्णय त्यामुळे खेळासंबंधी आवडीसाठी आणखी पोषक ठरणार आहे, असे मुस्लिम वुमन्स स्पोर्ट फाउंडेशनच्या रिमला अख्तर यांनी सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...