आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या गावामध्ये राहण्यासाठी मिळतात 45 लाख रुपये, हे आहे कारण...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - स्वित्झर्लंड येथील एका गावामध्ये राहण्यासाठी तब्बल 45 लाख रुपये दिले जातात. याठिकाणी असलेले माऊंटेने व्हिलेज कमी लोकसंख्येच्या प्रश्नांचा सामना करतोय. शहरीकरणामुळे अनेक लोक गाव सोडून शहराकडे वळताहेत. सध्या या गावाची लोकसंख्या केवळ 240 एवढी आहे. त्यामुळे 45 पेक्षा वय असलेल्यांना या गावात राहण्याची ऑफर दिली जातेय. 

 

गावातील शाळाही झाली आहे बंद

- स्वित्झर्लंड येथील हे गाव समुद्रसपाटीपासून 4265 फूट उंचीवर वसलेले आहे. याठिकाणाहून चर्चपासून सर्व प्रकारचे पारंपारिक घरे बांधलेली आहेत.
- महापालिका अध्यक्ष बीट जोस्ट म्हणाले की, शांती, सौंदर्य आणि ताज्या हवेसाठी हे गाव अप्रतिम आहे.
- नोकरीच्या कमतरतेमुळे या गावातील लोक शहरात स्थलांतरित होताहेत.
- मागील वर्षी तीन कुटूंब स्थलांतरित झाले. 
- आता याठिकाणी 240 लोकसंख्येसह 7 विद्यार्थी शिल्लक आहेत. ही मुले शिक्षणासाठी जवळच्या शहरात बसने जात आहेत.
- जोस्ट आता या ओसाड पडलेल्या गावात राहण्यासाठी लोकांच्या प्रतिक्षेत आहेत. येथे स्थायिक होणाऱ्या लोकांना संपत्ती विकत घेता येणार आहे.

 

कॅश इनिशिएटिव्हची डिमांड

- येथे राहणाऱ्या काही युवकांनी ऑगस्टमध्ये याचिका दाखल केली. यावर निम्म्या गावकऱ्यांनी सही केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, गाव सोडणाऱ्यांसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून कॅश द्यावी.
- यासाठी 30 नोव्हेंबरला मतदान केले जाणार आहे. महापालिकेने याला मंजुरी दिल्यास 45 पेक्षा अधिक व्यक्तीला 16, प्रति मुलामागे 6 लाख रुपये दिले जाणार आहेत.
- याचाच अर्थ एक जोडपे दोन मुलांसह स्थायिक झाल्यास 45 लाख रुपयांचा फायदा होणार आहे.

 

हे आहेत नियम व अटी

- याठिकाणी स्थायिक होणाऱ्या व्यक्तीने घर खरेदी केल्यानंतर 10 वर्षांनी गाव सोडून गेल्यास त्याला पूर्ण पैसे परत करावे लागणार आहे. 

 

पुढील स्लाईडवर पाहा - या गावातील फोटो...

बातम्या आणखी आहेत...