आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियात इसिसचा हल्ला: 135 जण मृत्युमुखी, 400 नागरिकांचे अपहरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरुत - इस्लामी स्टेटच्या(आयएस) अतिरेक्यांनी सिरियाच्या अल-जोरमध्ये केलेल्या हल्ल्यादरम्यान ४०० नागरिकांचे अपहरण करण्यात आले. शनिवारच्या या हल्ल्यात १३५ जण ठार झाले. अपहृत लोकांपैकी ३०० जणांची हत्या झाल्याचा संशय आहे. लंडन येथील सिरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सने ही माहिती दिली. निरीक्षकानुसार, आयएस बंडखोरांनी अल-जोरच्या ईशान्य भागात सरकार नियंत्रित भागावर हल्ला चढवला होता.
या हल्ल्यात १३५ जण ठार झाले. त्यात ८५ सामान्य नागरिक आणि ५० सरकार समर्थक बंडखोर होते. सिरियाच्या सरकारी प्रसारमाध्यमानुसार मृतांची संख्या ३०० असल्याचे सांगितले.
पुढील स्‍लाइडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..