आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियात बॉम्बस्फोट मालिकेत ४३ जण ठार; अध्यक्ष असद यांचा हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमास्कस- सिरियातबहुतांश सरकारी नियंत्रण असलेल्या परिसरात सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ४३ जण ठार तर ४५ जण जखमी झाले. मृतांपैकी ३० जण अध्यक्ष बशर अल असद यांचा प्रभाव शक्ती असलेल्या टार्टस किनारपट्टी भागातीलच आहेत, असे सरकारी माध्यमाने म्हटले आहे.
रशियाचा नाविक तळ असलेल्या टार्टस शहराबाहेर हे दुहेरी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. या बॉम्बहल्ल्याची जबाबदारी घेण्यास सध्या तरी कुठलीही अतिरेकी संघटना वा व्यक्ती समोर आलेली नाही.पण इस्लामिक स्टेट ग्रुप नियमितपणे अशा परिचरांना लक्ष्य करत आले आहे. एका दुसऱ्या हल्ल्यात दमास्कस येथील लष्करी तपासणी नाके कुर्दिश सुरक्षा दलाच्या हसकेह शहरावर अतिरेक्यांचे हल्ले झाले. यात सरकारी निवासस्थानांनाही लक्ष्य केले गेले होते.
टार्टसमधील दोन स्फोटांचे लक्ष्य अर्झुना पूल हेच लक्ष्य होते. यातील पहिला कार बॉम्बस्फोट होता तर, दुसरा स्फोट आत्मघातकी मानवी बॉम्ब होता. त्याने ही स्फोटके आपल्या कमरेच्या बेल्टमध्ये लपविली होती. लोकांनी स्फोटानंतर मोठी मदत करून जखमींना रुग्णालयात पोहोचविले. अशी माहिती राज्याच्या दूरचित्रवाहिन्यांनी दिली. सिरियातील हिंसेत टार्टस शहरच बहुतांश वेळेस लक्ष्य झाले आहे. सिरियातील ही यादवी २०११ मार्चमधील एका सरकारविरोधी निदर्शनानंतर सुरू झाली होती. याचा फटका अर्ध्यावर सिरियाला बसला आहे. दुसऱ्या एका आत्मघातकी बॉम्बहल्ल्यांत सिरियातील उत्तरपूर्वेकडील शहर हसाकेह येथे लोक मारले गेले आहेत. हा भाग मुख्यत: कुर्दिश सुरक्षा दलाच्या नियंत्रणातील आहे. यातील सहा जण आसायेश सुरक्षा दलाचे होते.
बातम्या आणखी आहेत...