आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखों लोक मरूनही सीरियाच्या राजधानीत सर्व काही सुरळित, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीरियाची राजधानी दमिश्कमधील मध्य शहरातील रस्त्यांवरील नजारा... - Divya Marathi
सीरियाची राजधानी दमिश्कमधील मध्य शहरातील रस्त्यांवरील नजारा...
इंटरनॅशनल डेस्क- सीरियात मागील सहा वर्षापासून अंतर्गत यादवी सुरु आहे. त्यामुळे तेथील अलेप्पो आणि रक्का यासारखी मोठी शहरे युद्धामुळे उद्धवस्त झाली आहेत. लाखों लोक या यादवीत मारले गेले आहेत. गेल्या सहा वर्षात किमान ४ लाख लोक मारले गेल्याचा एक अहवाल सांगतो. याउलट तेथील राजधानी दमिश्कमध्ये याचा फारसा परिणाम जानवत नाही. न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार, येथील लोक आताही पहिल्यासारखेच नॉर्मल लाईफ जगत आहेत. सेंट्रल दमिश्कमध्ये फारच चांगले वातावरण...
 
- अबु रुम्मानेहच्या आसपास परिसरातील शालन स्ट्रीट, सेंट्रल बॅंक आणि अल-मादफा स्क्वेयरपासून दमिश्कच्या इंडस्ट्रियल भागात कॉफी शॉप, फास्ट फूड ज्वाईंट्स, बार आणि रेस्टांरंटची गर्दी आहे. 
- येथे रोज शेकडोंच्या संख्येने लोक पोहचतात. गेल्या वर्षी आलेल्या द इंडिपेंडेटच्या रिपोर्टनुसार, मागील १-२ वर्षात येथे येणा-यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 
 
नाईट लाईफही सुरू आहे सुरळित-
 
- सीरियातील इतर शहराप्रमाणे येथील स्थिती नाही. येथील लोकांना मोर्टार किंवा क्षेपणास्त्र हल्ल्याची भीती नाही.
- येथील लोक आपल्या फॅमिलीसह आउटिंगला बाहेर पडतात. शहरातील कमर्शियल सेंटर परिसरात रस्त्यावर लोक फिरताना दिसतात.
- येथील नाईट लाईफ सुद्धा पहिल्यासारखी आहे. क्लब आणि पबमधील नाईट पार्टीज पहिल्यासारख्याच झगमगाटात होतात.
 
मिलिट्री बॅरकमध्ये शहराचे रूपांतर-
 
युद्ध आणि हिंसक कारवाया पाहता येथे आधीच सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील एका ठिकाण मिलिट्री बॅरकमध्ये रूपांतरित झाले आहे. सुरक्षेसाठी येथे सर्वत्र चेक प्वाईंट्स आहेत. तसेच प्रेसिडेंटचे समर्थन करणारी छोटी-मोठी ठिकाणे सहज दिसतात. येथील ब्रिज आणि चौकाचौकात सर्कलपासून ते ट्रॅफिक लाईट्स आणि गवर्नमेंट हेडक्वार्टर तर सीरियन फ्लॅगच्या रंगाने काँक्रीट ब्लॉकने सजवले आहेत. सोबतच, ठिकठिकाणी सीरियन प्रेसिडेंटच्या समर्थनचे स्लोगन लिहलेले दिसले. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, युद्धा दरम्यान दमिश्क शहरचे 14 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...