आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तरेत सिरियन फौजांची आगेकूच, 30 हजार स्थलांतरित; युद्ध सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरट - रशियाचा पाठिंबा असलेल्या सिरियाच्या फौजांनी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या विरोधातील कारवाई सुरू ठेवली आहे. शनिवारी उत्तरेकडील अलेप्पो प्रांतात सैन्याने आगेकूच केली आहे. त्यामुळे प्रदेशातील सुमारे ३० हजार नागरिक घरदार सोडून सुरक्षित ठिकाणी निघून गेले.  
 
अलेप्पोमधील महिला-मुले घर, गाव सोडून सुरक्षित ठिकाणी निघून गेले आहेत. लष्कराने प्रांतातील अनेक गावांतून इसिसच्या दहशतवाद्यांना हुसकावून लावले आहे व ही गावे ताब्यात घेतली आहेत. शनिवारीदेखील काही भागांत धुमश्चक्री, गोळीबार सुरू होता. गाव सोडून गेलेल्यांमध्ये मनबिज परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. लढाई वाढत असली तरी लष्कराला दहशतवाद्यांचा नायनाट करण्यात मोठे यश येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सने अनेक गावांतील हिंसाचार थांबवला आहे. सिरिया, इराकमध्ये इसिसच्या विरोधात मोठी लष्करी मोहीम सुरू आहे. त्यामुळे संघटनेच्या कारवायांना धक्का बसला आहे.
बातम्या आणखी आहेत...