आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिरियन सरकारचे शिष्टमंडळ वाटाघाटींसाठी आज जिनिव्हात; शांततेसाठी चर्चेची आठवी फेरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिनिव्हा- विरोधी पक्षासोबत शांतता चर्चेसाठी सिरिया सरकारचे शिष्टमंडळ बुधवारी जिनिव्हात दाखल होत असल्याची माहिती सिरियाच्या परराष्ट्र विभागातील अधिकाऱ्याने दिली. सरकारच्या संक्रमण काळाच्या स्थितीत सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर असद यांनी प्रथम पायउतार व्हावे या विरोधकांनी केलेल्या मागणीमुळे सरकार चर्चेत उशिराने सहभागी झाले. संयुक्त राष्ट्राने सिरिया सरकार व विरोधकांमध्ये शांतता चर्चा आज निश्चित केली.  


कोणत्याही पूर्वअटीशिवाय चर्चेत सहभागी होण्यास तयार असल्याचे विरोधी पक्षाने गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. त्यांचे शिष्टमंडळ येथे सोमवारी दाखल झाले. सिरिया सरकारचे शिष्टमंडळ येत असल्याचे कळले आहे, असे सिरिया प्रश्नातील युनोचे विशेष दूत मायकेल कोटेंट यांनी सांगितले. 

 

सरकार राजकीय चर्चेला घाबरते : विरोधी पक्ष  
विरोधकांच्या शिष्टमंडळाचे प्रमुख नासर हारिरी म्हणाले, आपण चर्चेस तयार आहोत, मात्र सरकारच ती टाळत आहे. सरकार राजकीय चर्चेला घाबरत आहे ही मुख्य बाब आहे. गेल्या आठवड्यात सौदीच्या मदतीने “मॉस्को ग्रुप’चा समावेश वाटाघाटीत झाला. असाद यांनी पायउतार होण्यास मॉस्कोचा मात्र  विरोध आहे.

बातम्या आणखी आहेत...