आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरापूर्वी बापलेक दारोदारी भटकत होते, आज जगतायत हॅपी लाईफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओसामा अब्दुल मोहसिन नावाच्या सीरियन निर्वासिताचा हा फोटो(डावीकडला)जगभरात व्हायरल झाला होता. - Divya Marathi
ओसामा अब्दुल मोहसिन नावाच्या सीरियन निर्वासिताचा हा फोटो(डावीकडला)जगभरात व्हायरल झाला होता.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्‍ये या सीरियन निर्वासिताचे फोटोज व व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले होते. ओसामा अब्दुल मोहसिन नाव असलेला हा व्यक्ती राहण्‍यासाठी दारोदारी फिरत होता. मात्र आज तो स्पेनमध्‍ये आपला मुलगा जैदसोबत सुखी जीवन जगत आहे. हंगेरीत सीमा ओलांडत असताना कॅमेरामनने  त्याला लाथ मारुन खाली पाडले होते. याचा फोटो नंतर जगभर व्हायरल झाला होता. स्पोर्ट्स अॅकेडमीत मिळाली नोकरी... 
 
- या घटनेच्या सात महिन्यानंतर अब्दुल व जैद यांचे चांगले दिवस पुन्हा सुरु झाले आहे. 
- माद्रिदच्या बाहेरील भागात सीरियन निर्वासितांना राहण्‍यासाठी घरे व नोक-या दिल्या गेल्या आहेत. 
- स्पेनच्या एका स्पोर्ट्स अॅकेडमीला कळाले, की अब्दुल सीरियाच्या फर्स्ट डिव्हीजन टीमचे कोच म्हणून काम केले आहे. 
- यानंतर एका अॅकेडमीने अब्दुलला लाइजन ऑफिसरची नोकरी दिली. त्याला नवीन घरही मिळाले. 
- त्याचा मुलगा जैद शाळेत जाण्‍याबरोबरच फुटबॉलचे प्रशिक्षणही घेत आहे. 
- मात्र अब्दुल येथील जीवनशैली व भाषा त्याला अडचणीची ठरत आहे. 
- तो म्हणाली, की तो स्पॅनिश भाषा शिकत आहे. यामुळे खेळाडूंना मार्गदर्शन करताना त्याला संवादाची अडचण येऊ नये. 
- त्याचा मुलगा जैदला स्पॅनिश भाषा येऊ लागली आहे व तो वडिलांना मदत करत आहे. 
- अब्दुल आपली पत्नी व इतर मुले तुर्कस्तानच्या मर्सिन शहरात सोडून आला होता. 
- त्याचे आपल्या कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकलेला नाही. याच त्याला खूप दु:ख आहे. 
- अब्दुल म्हणाला, माझे रोज तीन मुलाखती घेतल्या जात आहे. तरही मी आपल्या कुटुंबीपर्यंत पोहोचू शकलो नाही. 
 
कॅमेरामनने गमवली नोकरी 
- हंगेरीच्या सीमेवर दाखल होताच महिला कॅमेरामन पेट्रा लाझ्लोने अब्दुलला लाथ मारुन पाडले होते. 
- या नंतर सोशल मीडियावर पेट्राच्या या कृतीवर बरीच टीका झाली. 
- लोकांना याला द्वेषाचे चित्र म्हटले. यानंतर चॅनलने तिला नोकरी काढले. 
- नवीन नोकर मिळवण्‍यासाठी पेट्राला हंगेरीपर्यंत सोडण्‍यात आले. तिच्याविरुध्‍द वंशद्वेषाचाही खटला चालला. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...   
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)