आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तैवानने चुकून चीनच्या दिशेने डागले मिसाइल, 75 किमी लांब समुद्रात पडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
300 किलोमीटर रेंज असणा-या सिअंग फेंग-3 मिसाइल 75 किमी दूर पेंघूमध्ये कोसळले. - Divya Marathi
300 किलोमीटर रेंज असणा-या सिअंग फेंग-3 मिसाइल 75 किमी दूर पेंघूमध्ये कोसळले.
तैइपे - तैवानच्या एका युध्‍दनौकेने शुक्रवारी(ता.एक) चुकून 'एअरक्राफ्ट कॅरिअर किलर' मिसाइल चीनच्या दिशेन डागले. येथील नौदलाने सांगितले, की 30 किलोमीटर रेंज सिअंग फेंग-3 मिसाइल 75 किमी दूर पेंघूमध्‍ये पडले. हा तैवानच्या बेटाचा भाग आहे. मिसाइल सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी(स्थानिक वेळ) उत्तर शहर सोयिंगहून डागले. येथून चीन 300 किमी लांब आहे. चुक कळताच मिसाइल शोधण्‍यासाठी पाठवले हेलिकॉप्टर्स...
- नौदलानुसार, हे मिसाइल कसे लॉन्च झाले याबाबत अद्याप अस्पष्‍टता आहे. मात्र हे मानवी चुकांमुळे घटना घडली.
- नौदलाचे व्हाईस अॅडमिरल मेई शिआ-शूने मीडिया सांगितले, सुरुवातीच्या चौकशीत ही साधारण गोष्‍ट नसल्याचे समोर आले होते.
- चुक कळताच हेलिकॉप्टर्स व नौदलाच्या नौका मिसाइल शोधण्‍यासाठी पाठवले.
- बेटाची सिक्युरिटी बॉडी नॅशनल सिक्युरिटी कॉन्फ्रन्सला तातडीने या चुकीची माहिती दिली.
चीनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही
- चीनचा अभ्‍यास करणा-या तैवानचे मेनलँड अफेअर्स कौन्सिलने सांगितले, की या घटनेमुळे बीजिंगकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.
- जानेवारी महिन्यात डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचे (डीपीपी) त्साई इंग वेन यांना राष्‍ट्रपतींची निवड केल्यानंतर तैवान-चीनच्या संबंधात प्रथमच बिघडले आहेत.
- 1949 च्या यादवी युध्‍दात स्वातंत्र होऊनही चीन आजही तैवानला आपला भाग समजतो.