आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजिकिस्तान: अतिरेक्यांसारखे दिसू नये म्‍हणून 13 हजार लोकांची काढली दाढी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुशाम्बे (ताजिकिस्तान) - सरकारच्या आदेशावरून ताजिकिस्तानमधील सुमारे १३ हजार लोकांची दाढी पोलिसांनी मध्यस्थी करून काढण्यात आली. लोक दहशतवाद्यांसारखे दिसू नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, मुलींना स्कार्फ घालण्यासही मनाई करण्यात आली असून चेहरा पूर्ण झाकता येणार नाही.
देशातील खतलून विभागाचे पोलिस प्रमुख बहरोम शरीफजादा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी १७०० हून अधिक महिला-मुलींना समजावून सांगत स्कार्फ घालण्यापासून परावृत्त केले आहे. एवढ्यावरच ही कारवाई थंाबलेली नाही. पारंपरिक मुस्लिम कपडे विकणाऱ्या दुकानदारांना ही दुकाने तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी हा आदेश लागू होताच चेहरा झाकून जाणाऱ्या ८९ महिलांना ताब्यात घेतले आहे. या महिला शरीरविक्रय करणाऱ्या असल्याची माहिती आहे. या सर्व आदेशांना राष्ट्रपती अमोमाली रहेमान यांनी मंजुरी दिली आहे. धर्मनिरपेक्षतेला चालना मिळावी म्हणून प्रयत्न करणारे राष्ट्रपती अशी रहेमान यांची ओळख आहे.
मुस्लिम देश तरीही...
ताजिकिस्तान हा खरे तर मुस्लिम देश आहे. मात्र, एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून त्याची ओळख आहे. गेल्या आठवड्यात अरबी पद्धतीची नावे ठेवण्यावरही बंदी घालावी या प्रस्तावाला संसदेत बहुमताने मंजुरी दिली होती.
रहेमान १९९२ पासून प्रमुख
- रहेमान १९९२ पासून देशाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.
- १९९४ पासून ते राष्ट्रपतिपदावर विराजमान आहेत.
- २०२० मध्ये रहेमान यांचा कार्यकाळ संपत आहे.