आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच दहशतवादी गटांवर कारवाई करा, अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा सुनावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - फक्त आपल्या देशासाठी धोकादायक असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्याऐवजी शेजारी देशांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी गटांवर कारवाई करा, असा स्पष्ट संदेश अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे. भारताने गुरुवारी सार्कच्या गृहमंत्र्यांच्या परिषदेत घेतलेल्या भूमिकेवरच यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उप प्रवक्ता मार्क टोनर दैनंदिन पत्रकार परिषदेत म्हणाले की, शेजारी देशांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी गटांवरही कारवाई करा आणि त्यांच्यासाठीची सुरक्षित स्थळे नष्ट करा, असे आम्ही पाकिस्तान सरकारच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे. राजनाथ सिंह यांच्या सार्क परिषदेतील वक्तव्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता टोनर म्हणाले की, पाकिस्तान सध्या दहशतवाद्यांवर कारवाई करत आहे, पण ती काही विशिष्ट गटांच्या विरोधात आहे. त्याऐवजी देशातील सर्व दहशतवादी गटांवर कारवाई करावी, असे त्या पाकिस्तानला सांगण्यात
आले आहे.
सार्क परिषदेबाबत विचारले असता टोनर म्हणाले की, दहशतवादाच्या विरोधात कारवाई करण्याच्या प्रयत्नांबाबत चर्चा होत आहे हे चांगलेच आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना दहशतवादाचा धोका आहे. त्याला तोंड देण्यासाठी उभय देशांनी सहकार्य करावे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे दक्षिण अाशियात दहशतवादावर चर्चा करण्यासाठी असे मंच आवश्यक आहेत.
अफगाणिस्तानच्या मदतीने कारवाई करावी
अमेरिकेने पाकिस्तानची ३० कोटी डॉलर्सची लष्करी मदत रोखल्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना टोनर म्हणाले की, फक्त पाकिस्तानसाठी नव्हे तर संपूर्ण विभागासाठी धोकादायक असणाऱ्या दहशतवादी गटांच्या विरोधात अफगाणिस्तानच्या सहकार्याने कारवाई करावी, असे आम्ही पाकिस्तानला सुचवले आहे. पाकिस्तानने ते गांभीर्याने घेतले असेल असा विश्वास अमेरिकेला आहे.
बातम्या आणखी आहेत...