आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉलर घेऊनच व्याख्यान देणार : बिल क्लिंटन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - हिलरी क्लिंटन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत, तरीही आपण डॉलर घेऊन व्याख्यान देणे सुरू ठेवणार असल्याचे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी सांगितले. क्लिंटन फाउंडेशनला परदेशातूनही देणगी मिळते. याचे बिल यांनी समर्थनच केले. परदेशातून आर्थिक मदत घेण्यात काहीच चूक नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. क्लिंटन फाउंडेशनला परदेशातून मिळणारे अर्थसाहाय्य सध्या विवादास्पद प्रकरण झाले आहे, तरीही बिल यांनी त्याचे समर्थन केले आहे. हिलरींच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी हे घातक ठरू शकते. निवडणूक प्रचार अभियानात हा वाद अडथळा ठरत आहे.

हिलरींची प्रतिमा स्वच्छ सादर करण्यासाठी फाउंडेशनची सर्व जबाबदारी आपली एकट्याची असल्याचे बिल यांनी म्हटले आहे. हिलरी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या, तर या फाउंडेशनच्या कामातील सक्रियता कमी करण्याचे बिल म्हणाले.

फाउंडेशन वाद
अमरसिंह यांनी क्लिंटन फाउंडेशनला १ ते ५० लाख डॉलर्स देणगी दिल्याची बातमी होती. त्यावरून वादंग झाले. त्या वेळी हिलरी यांनी अॅटमी कराराला सहमती दिली होती.

पुरावा नाही
अमेरिेेकी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले, ‘परदेशी देणगी घेऊन हिलरींनी निर्णय प्रभावाखाली घेतल्याचा पुरावा नाही,परराष्ट्र धोरणातील निर्णयाला त्यांनी फाटा दिलेला नाही.’
पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ? वर्ष २००८ मध्ये हिलरी यांनी डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार म्हणून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली. मात्र, आेबामांचा विजय झाला. आेबामांनी हिलरी यांना परराष्ट्रमंत्रिपद दिले. दुस-या कार्यकाळात त्यांनी हिलरींना संधी दिली नाही. अमेरिकेच्या २२० वर्षांपेक्षा जास्त जुन्या लोकशाही व्यवस्थेतील पहिली महिला राष्ट्राध्यक्षा होण्याचा मान हिलरी क्लिंटन यांना मिळण्याची शक्यता आहे.