आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण अफगाणिस्तानात तालिबानची पीछेहाट; अफगाणिस्तानच्या लष्करी सूत्रांनी दावा केला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल- अफगाणिस्तानच्या लष्करी सूत्रांनी दावा केला आहे की दक्षिण अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या कब्जातील मोठा प्रदेश सैन्याने ताब्यात घेतला आहे. येथील महत्त्वाच्या जिल्ह्यांमधून तालिबान्यांची पीछेहाट झाली आहे. दक्षिण हेलमांड राज्यावर तालिबान्यांचे वर्चस्व होते.  अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता दौलत वझिरी यांनी सांगितले की, नावे जिल्ह्यातील स्थिती सर्वात वाईट होती. येथे ५० तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर ५ सुरक्षा रक्षक जखमी झाले. हेलमांडची राजधानी लष्कर गाह येथून नावे जिल्हा १६ किलोमीटर अंतरावर आहे. तालिबान्यांना लष्कर गाह ताब्यात घ्यायचे होते. तालिबानी दहशतवाद्यांविरुद्ध हाती घेतलेल्या मोहिमेला यश आल्याचा दावा सरकारने केला आहे.  

येथून सरकारी फौजांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. दरम्यान, सरकारने केलेल्या दाव्यावर तालिबानने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. नावे जिल्ह्यातून आपली पीछेहाट झाल्याचे अद्याप तालिबानने अधिकृतरीत्या मान्य केले नाही. अफगाण फौजांसह हेलमांडमध्ये अमेरिकी आणि नाटो सैन्यदले तैनात आहेत.  अम ेरिका लवकरच येथील सैन्य दले वाढवणार असून पाकिस्तानमधून तालिबान्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोप पुन्हा एकदा अफगाणिस्तानने केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...