आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस प्रशिक्षण केंद्रावर तालिबान्यांचा बॉम्बहल्ला; 32 जण ठार, 200 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खोस्त / काबूल - तालिबानी दहशतवाद्यांनी मंगळवारी अफगाणिस्तानातील आग्नेय आणि पश्चिमेकडील विविध स्थानांवर हल्ला केला. सर्वात मोठा हल्ला पक्टिया प्रांतात पोलिस प्रशिक्षण केंद्रावर करण्यात आला. यात ३२ जणांचा बळी गेला. २०० नागरिक जखमी झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. प्रशिक्षण केंद्रात दहशतवाद्यांनी प्रथम आत्मघातकी बॉम्बस्फोट केले. त्याचा फायदा घेत अनेक दहशतवाद्यांनी गोळीबार करत प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी केली. 

सुरक्षा दलांशी त्यांचा सामना झाला. काही दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. दक्षिण गझनीच्या अंडार जिल्ह्यात मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांनी  हल्ला केला. पश्चिम फरह प्रांताच्या शिबखो जिल्ह्यात एका सरकारी कंपाउंडमध्ये दहशतवादी हल्ल्यात तीन पोलिस कर्मचारी ठार झाले. अफगाण पोलिसांनी सोमवारी एका ट्रकमधून ३ टन स्फोटके जप्त केली.  

पाकिस्तानात सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकी ड्रोन हल्ला, २६ दहशतवादी ठार  : पाकिस्तानच्या कुर्रम कबाइली क्षेत्रात अमेरिकी सैन्याने सतत दुसऱ्या दिवशी मंगळवारीदेखील ड्रोन हल्ला केला. यात हक्कानी नेटवर्कचे ६ दहशतवादी ठार झाले. यापूर्वी सोमवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यात २० दहशतवादी ठार झाले होते. अफगाणिस्तान सीमेला लागून पाकिस्तानच्या या क्षेत्रात कॅनडाच्या जोशुआ बोयले आणि त्यांची अमेरिकन पत्नी कॅटलन कोलमन यांना हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी कैद केले होते.
बातम्या आणखी आहेत...