आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taliban Leader Mullah Omar Killed, Journalist Claims In Afghanistan

अफगाणिस्तान सरकारचा दावा, मारला गेला तालिबानचा म्होरक्या मुल्ला ओमर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुल्ला ओमर. - Divya Marathi
मुल्ला ओमर.
काबुल - अफगाणिस्तान सरकारने तालिबानचा म्होरक्या मुल्ला ओमर ठार झाला असल्याचा दावा केला आहे. एक स्थानिक अफगाण पत्रकार हारुण नजाफीजादा यांनी सरकारमधील दोन सुत्रांच्या हवाल्याने ट्विटरवर तसा दावा केला आहे. मात्र तालिबान कडून अद्याप याबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

अफगानिस्तानमध्ये असलेल्या या पत्रकाराने ट्विटद्वारे म्हटले आहे की, अफगाण नॅशनल युनिटी गव्हर्नमेंटमधील दोन खात्रीलायक सुत्रांनी त्याला माहिती दिली आहे. त्यानुसार तालिबानचा म्होरक्या मुल्ला ओमर मारला गेला आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये मुल्ला ओमरच्या मृत्यूबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे यावेळी तरी ही बातमी खरी असणार की नाही, अशी शंका आहे.
पुढील स्लाइडवर पाहा. पत्रकाराने केलेले ट्विट...