आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायींसाठी पित्याने विकले, 11 महिनेे या मुलीवर झाला बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही आहे टांझानियाच्या शिनयांग शहराची ग्रेस मसानजा. तिला तिच्या वडिलांनी 12 व्या वर्षी विकले व बदल्यात घेतल्या 12 गायी. तिच्यावर 11 महिने बलात्कार करण्‍यात आला. टांझानियाच्या सुकुमा जमातीत मुलींची छळवणूक ही सामान्यबाब आहे. याला येथे कायदेशीर मान्यता आहे. या देशातील भाषेत याला ' कुपुरा' असे म्हटले जाते. विवाहाला नकार दिल्याने खाल्ला मार...

- एका बिगर शासकीय संस्थेने (एनजीओ) ग्रेसशी संवाद साधला. तिने त्यांना सांगितले, माझ्याबरोबर जनावरांप्रमाणे वर्तणूक करण्‍यात आली. जेव्हाही या गायींना पाहते तेव्हा माझ्या भावना अनावर होतात.
- ग्रेस म्हणते, मला कधी कधी वाटते की कदाचित मी गाय असते. एका मोठ्या व्यक्तीबरोबर माझ्या विवाहाची बोलणी चालू होती. मी वडिलांना विवाहाला नकार दिला. वडील मला रोज काठी व कमरपट्ट्याने मारत होते. तरीही मी विवाहाला नकार दिला
व‍डील-पती यांच्यात हुंड्याचा करार
- ग्रेस सांगते, वडिलांची त्या व्यक्तीबरोबर करार झाला होता. त्याने ग्रेसच्या बदल्यात 12 गायी दिल्या.
- एकेदिवशी अचानक सकाळी सकाळी ग्रेसला भावी पतीने तिला पळून नेले.
- पहिल्या रात्रीपासून पुढील 11 महिन्यापर्यंत तिच्या पतीने तिला मारहाण व बलात्कार केला.
तरुणींचे स्नॅचिंग सर्वसामान्य बाब
- सुकुमा जमातीत तरुणींशी जबदरस्तीने शारीरिक संबंध ठेवणे ही बाब सर्वसामान्य आहे.
- येथील तरुण फक्त तीन गोष्‍टींवर विश्‍वास ठेवतात, दारु, कवाब आणि शरीरसंबंध.
- एखाद्या मुलाची जर एखाद्या मुलीवर नजर पडल्यास तो तिला उचलून नेतो.
- मुलीचे घरची मंडळी पोलिसांना बोलवण्‍याऐवजी पळवून नेणा-या मुलीच्या बदल्यात पैसे किंवा जनावरे घेतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा टांझानियाच्या या जमातीचे छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)